शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:14 AM2018-07-24T03:14:20+5:302018-07-24T03:14:44+5:30

७ दिवसांत नेमणूक न केल्यास टाळे ठोकण्याचा इशारा

Lack of teachers due to lack of teachers | शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

Next

-कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीत देवपाडा गावात जिल्हा परिषदेची शाळा असून, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दीड वर्षापूर्वी येथील एका शिक्षकाची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अद्याप दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नसल्याने पालक आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली
आहे.
अनेक वेळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही अद्याप शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने पुन्हा एकदा शिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पत्र दिले आहे. सात दिवसांत शिक्षकाची नेमणूक केली नाही तर शाळेला टाळे ठोकू असा इशारा देवपाडा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.
देवपाडा येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून येथे सुमारे दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देवपाडा गावासह आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. या शाळेत मुख्याध्यापकासह चार शिक्षक आहेत. मुख्याध्यापकांना अतिरिक्त कामे असल्याने त्यांना दररोज शिकवण्यास वेळ नसतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले दिसते. देवपाडा शाळा त्याला अपवाद नाही. देवपाडा या ग्रामीण भागात असलेल्या शाळेत देवपाडा व आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील मुले या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असतात.
शासनाने या शाळेकडे दुर्लक्ष केले असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पुन्हा एकदा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला पत्र देऊन देवपाडा शाळेवर सात दिवसांत शिक्षकाची नेमणूक करावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती शाळेला टाळे ठोकू व जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवूअसा इशारा पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिणारे यांनी दिला आहे.

शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात नव्याने रु जू झालेल्या गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

देवपाडा शाळेतील एका शिक्षकाची दीड वर्षापूर्वी बदली करण्यात आली आहे. त्या जागी अद्याप दुसºया शिक्षकाची नियुक्ती करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गतवर्षी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे शिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी केली होती. परंतु अद्याप नेमणूक करण्यात आली नसल्याने पुन्हा एकदा शिक्षकाची मागणी करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. सात दिवसांत शिक्षकाची नियुक्ती केली नाही तर शाळेला टाळे ठोकू, असेही कळविले आहे.
- लक्ष्मण शिणारे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, देवपाडा

Web Title: Lack of teachers due to lack of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.