शिमग्यासाठी गजबजला मुंबई-गोवा महामार्ग, चौपदरीकरणामुळे वाहतुकीला अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:24 AM2018-03-03T02:24:54+5:302018-03-03T02:24:54+5:30

कोकणात गणपती, शिमगा (होळीचा सण) आणि अष्टमी हे मुख्य सण आहेत. लाखोंच्या संख्येने मुंबई आणि गुजरातमध्ये नोकरीनिमित्त गेलेले चाकरमानी या तीन सणाला आपल्या गावी मोठ्या संख्येने हजर राहून उत्साहात सण साजरा करतात.

Gazabjal Mumbai-Goa highway for Shimagua, four-way traffic due to four-laning | शिमग्यासाठी गजबजला मुंबई-गोवा महामार्ग, चौपदरीकरणामुळे वाहतुकीला अडचणी

शिमग्यासाठी गजबजला मुंबई-गोवा महामार्ग, चौपदरीकरणामुळे वाहतुकीला अडचणी

Next

दासगाव : कोकणात गणपती, शिमगा (होळीचा सण) आणि अष्टमी हे मुख्य सण आहेत. लाखोंच्या संख्येने मुंबई आणि गुजरातमध्ये नोकरीनिमित्त गेलेले चाकरमानी या तीन सणाला आपल्या गावी मोठ्या संख्येने हजर राहून उत्साहात सण साजरा करतात. गुरुवारी आणि शुक्रवारी या सणासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आले. त्यामुळे गेली दोन दिवस मुंबई - गोवा महामार्ग गजबजलेला होता. ठिकठिकाणी सुरू असलेले चौपदरीकरणाचे महामार्गाचे काम वाहतुकीला अडथळा ठरत होते, तर मोठ्या संख्येने कोकणात येणाºया वाहतुकीला अवजड वाहतूक देखील डोकेदुखी बनली होती.
कोकणात अष्टमी, गणपती आणि शिमगा हे तीन सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. व्यवसाय आणि नोकरीनिमित्त गेले असेलेले भारताच्या कानाकोप-यात आणि मोठ्या संख्येने मुंबईला असलेले कोकणातील चाकरमानी या तीन सणासाठी आपल्या गावी दरवर्षी मोठ्या संख्येने हजर असतात. गणपती आणि अष्टमी हा सण हा पावसाळ्यात येतो. मुंबईहून कोकणात जाणारा चाकरमानी पावसात मुंबई - गोवा महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला होणारे अडथळे पाहता मुंबई-पुणे दु्रतगती मार्गाने कोकणात जाण्यास पसंत करतो. तर पोलीस प्रशासन देखील त्यावेळी त्यांना त्याच मार्गी रवाना होतात. या दु्रतगती मार्गाने १०० किमी अंतर जास्त पडले तरी वेळ थोडाफार वाचतो तर प्रवासाला त्रास होत नाही. शिमगा हा सण दरवर्षी मार्च महिन्यात येत असतो. महामार्गाची डागडुजी पाहता मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी या शिमग्याच्या सणाला आपल्या गावी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुनच जातात. यंदाच्या या होळी सणासाठी मुंबई आणि इतर राज्यातील कोकणातील चाकरमानी हजारोच्या संख्येने या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाने गेल्याने गेली दोन दिवस हा महामार्गावर छोट्या वाहनांच्या रांगाच रांगा पहावयास मिळत होत्या, तर २४ तास हा महामार्ग गजबजलेला होता.
>अवजड वाहनांचा त्रास
गणपती सणासाठी महामार्गावर दरवर्षी अवजड वाहनांच्या ट्रॅफिकचा विचार करता काही काळ बंद करण्यात येतात. दोन दिवसांच्या शिमगा सणासाठी मोठ्या संख्येने जाणाºया कोकणातील वाहतुक ीला अवजड वाहनांचा फार मोठा त्रास सहन करावा लागला. चढावाच्या ठिकाणी धीम्या गतीने जाणाºया अवजड वाहनांमुळे छोट्या वाहनांच्या लांब लांबपर्यंत रांगा लागत होत्या. तर समोरुन येणाºया वाहनांमुळे छोट्या वाहनांना ५ ते ७ किमीपर्यंत ओव्हरटेक करता येत नव्हता. त्यामुळे दोन दिवस वाहतुकीस अवजड वाहनांचा फार मोठा त्रास सहन करावा लागला. तरी गणपती सणाप्रमाणे शिमग्याला देखील काही काळ अवजड वाहने बंद करावी, अशी चालकांकडून आणि चाकरमान्यांकडून मागणी करण्यात येत आहे.
सध्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे काम सुरू आहे. शिमग्यासाठी कोकणात जाणाºया वाहतुकीला गुरुवारी फटका चांगला बसला. माती भरावाचे डंपर वाहतुकीला अडथळा निर्माण करत होते. मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरून जाण्याला चाकरमान्यांनी प्राधान्य दिल्याने महामार्ग गजबजला.

Web Title: Gazabjal Mumbai-Goa highway for Shimagua, four-way traffic due to four-laning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.