म्हसळ्यातील २ गावे व ९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:44 AM2018-05-18T02:44:21+5:302018-05-18T02:44:21+5:30

म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना, सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही.

Deep water shortage in 2 villages and 9 villages in Mhasla | म्हसळ्यातील २ गावे व ९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई

म्हसळ्यातील २ गावे व ९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई

googlenewsNext

अरूण जंगम 
म्हसळा : म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना, सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही. तालुक्यातील खामगाव व गायरोणे या दोन गावांना व नऊ वाड्यांना विंधण विहीर करण्यासाठी प्रस्ताव एक वर्षअगोदर मंजूर केला असूनसुद्धा विंधण विहिरींबाबत कार्यवाही करण्यात पंचायत समिती प्रशासनास अपयश आले असल्याचे दिसून येत आहे.
माजी सभापती महादेव पाटील यांनी म्हसळा तहसीलदारांना निवेदन दिले असून, आठ दिवसांत या विंधण विहिरींचे काम पूर्ण न झाल्यास ही दोन गावे व नऊ वाड्यांमधील लोकांना घेऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून म्हसळा तालुका ओळखला जातो. पावसाचे सरासरी प्रमाण पाहता म्हसळा तालुक्यातील पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा जास्त असूनही म्हसळा तालुक्यातील दोन गावे व जवळपास नऊ वाड्यांवर दरवर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते.
पाऊस पडूनही पाणी साठविण्याचे नियोजन व वाहत जाणारे पाणी अडविले जात नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. केवळ नळपाणी पुरवठा योजना राबविण्यापेक्षा पाण्याचे स्रोत व उगमस्थाने बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
म्हसळा तालुक्यातील जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणलोट योजना, वनराई उपक्र म, शासनाचे विविध प्रकारचे उपक्र म कागदावरच झाले आहेत. वास्तविक पाहता जनतेस त्याचा काहीच उपयोग नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ११ विंधण विहिरींना तत्काळ मंजुरी देऊनसुद्धा स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
म्हसळ््याच्या ग्रामीण भागात लोकांना जसे पाणी मिळणे कठीण झाले आहे, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांची तहान हा मोठ्या चिंतेचा भाग बनली आहे.
विंधण विहीर खोदण्याबाबतीत कंत्राटदारांना संपर्क करूनही ते येण्यास तयार होत नाहीत. विंधण विहिरींना आलेला निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात येणार असून, विंधण विहिरींचे काम संबंधित ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण झाल्यावर त्या ग्रामपंचायतीकडून बिल चेकने कंत्राटदारास अदा करणार असल्याने काम लवकरात लवकर पूर्ण होईल.
- वाय. एम. प्रभे, गटविकास अधिकारी,
पंचायत समिती म्हसळा
या गावातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. लहान मुलांनादेखील पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. या गावांमध्ये विंधण विहिरींना मंजुरी मिळून एक वर्ष झाले असून प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
- महादेव पाटील, माजी उपसभापती
विंधण विहिरी मंजूर गावे
खामगाव, गायरोणे
विंधण विहिरी मंजूर वाड्या
केल्टे चंदनवाडी, निगडी मोहल्ला,
रु द्रवट, घुम, खानलोशी बौद्धवाडी, पेडांबे आदिवासीवाडी, पाभरे विठ्ठलवाडी, खामगाव आदिवासीवाडी, जिजामाता हायस्कूल वरवठणे.

Web Title: Deep water shortage in 2 villages and 9 villages in Mhasla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.