दापोली-पुणे शिवशाही बसला लोणेरेजवळ अपघात, 31 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:48 PM2018-08-25T13:48:42+5:302018-08-25T13:53:36+5:30

राज्य परिवहन मंडळाच्या दापोली-पुणे शिवशाही बसला रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

dapoli pune shivshahi bus accident near lonere 31 passengers injured | दापोली-पुणे शिवशाही बसला लोणेरेजवळ अपघात, 31 प्रवासी जखमी

दापोली-पुणे शिवशाही बसला लोणेरेजवळ अपघात, 31 प्रवासी जखमी

googlenewsNext

लोणेरे - राज्य परिवहन मंडळाच्या दापोली-पुणे शिवशाही बसला रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले असून जखमींना उपचारांसाठी माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दापोलीवरुन पुण्याच्या दिशेने ही बस जात असताना शनिवारी (25ऑगस्ट) सकाळी हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बस पलटल्याने ३१ प्रवासी जखमी झाले. लोणेरे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ हा अपघात घडला. 

Web Title: dapoli pune shivshahi bus accident near lonere 31 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.