मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्ती : चंद्रकांत पाटील यांनी घेतला कामाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 02:20 PM2018-09-07T14:20:53+5:302018-09-07T14:22:42+5:30

गणेश चतुर्थीला चाकरमान्यांना कोकणाकडे जाणे सुकर व्हावे, यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल येथे दिले. 

chandrakant patil inspects Mumbai Goa highway | मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्ती : चंद्रकांत पाटील यांनी घेतला कामाचा आढावा

मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्ती : चंद्रकांत पाटील यांनी घेतला कामाचा आढावा

Next

- जयंत धुळप
अलिबाग - गणेश चतुर्थीला चाकरमान्यांना कोकणाकडे जाणे सुकर व्हावे, यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल येथे दिले. यासंदर्भात पाटील यांनी शुक्रवारी सायन-पनवेल ते पळस्पे या दरम्यान महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर पनवेल शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.  

पाटील यांनी गेल्या आठवड्यात (31 ऑगस्ट) महामार्ग पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या आत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा त्यांनी आजच्या बैठकीत घेतला. गणेश चतुर्थीसाठी भाविक कोकणाकडे निघण्याआधी खड्डे भरुन रस्ता रहदारीस योग्य करुन देण्याबाबत पाटील यांनी सूचना केल्या. रस्त्याच्या भूसंपादन कामातील शिल्लक कामांचाही आढावा त्यांनी घेतला. आता संपूर्ण महामार्गाचे काम गतीने व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान पाटील यांनी पळस्पे फाट्यापर्यंत रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते कोकण भवन येथे सुनावणी कामकाजासाठी रवाना झाले.

महामार्ग टप्पा पनवेल ते इंदापूर :  या दरम्यान 84.6 किमी रस्त्याच्या कामात  6 मोठे पूल असून 25 लहान पूल आहेत, एक फ्लाय ओव्हर असून 3 रेल्वे पूल आहेत. 15 सब वे (पादचाऱ्यांसाठी), 12 सब वे ( वाहनांसाठी) असून अन्य 12 मोठ्या तर 94 लहान रस्ते छेदक आहेत. या दरम्यान एकूण 52 बस थांबे असून  4 ठिकाणी ट्रक थांबे आहेत.
 

Web Title: chandrakant patil inspects Mumbai Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.