Car accident near Mangaon | माणगावजवळ कारला अपघात
माणगावजवळ कारला अपघात

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मोरीचा कठडा तोडून कार नाल्यात पडून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर एक जण जखमी झाला. इंदापूर गावच्या हद्दीत हॉटेल दीपक जवळ हा अपघात ८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघाताची माहिती अभिजीत रामगडकर (२३, रा. भरडखोल, ता. श्रीवर्धन) यांनी माणगाव पोलीसठाण्यात दिली. अभिजीत रामगडकर हे कार गाडी क्र . एम. एच. ०६ बी. एम. २२०६ घेऊन मुंबई येथून दिवेआगरकडे जात होते. त्यांच्या सोबत सुमित पाटील (२३, रा. दिवेआगर ता. श्रीवर्धन) हे बाजूच्या सीटवर बसले होते. त्यांची गाडी माणगाव जवळील इंदापूर गावच्या हद्दीत हॉटेल दीपकजवळ आली असता, पुढच्या गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाºया गाडीच्या हेडलाइटमुळे त्यांनी ब्रेक मारला असता, गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीचा कठडा तोडून खाली नाल्यात कोसळली.
या भीषण अपघातात सुमित पाटील यांचा मृत्यू झाला, तर चालक अभिजीत रामगडकर हे जखमी झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीसठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सी. आर. अंबरगे हे करीत आहेत.


Web Title: Car accident near Mangaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.