कर्जतमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:11 AM2018-12-06T00:11:01+5:302018-12-06T00:11:07+5:30

कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरातील लोभेचीवाडी येथील जांभळीच्या माळावर बुधवारी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

The body of the woman found in a rotten condition in Karjat | कर्जतमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

कर्जतमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

googlenewsNext

कर्जत : कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरातील लोभेचीवाडी येथील जांभळीच्या माळावर बुधवारी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. हा मृतदेह महिलेचा असल्याचे सांगण्यात येत असून या महिलेचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांकडून समजले आहे.
तालुक्यातील लोभेचीवाडी शेजारी असणाऱ्या जांभळीच्या माळावर गावातील मुले क्रिकेट खेळत होती. त्यातील एकाने बॉल जोरदार मारल्याने तो बाजूच्या झाडीत गेला. करवंदीच्या जाळीत बॉल शोधत असताना त्यांना दुर्गंधी आली. तेथे जमिनीतून बाहेर मानवी कवटी असल्याचे दिसले. त्या ठिकाणी कुत्रे जमीन उकरत होती. त्यामुळे मुलांनी तेथून पळ काढून ही घटना ग्रामस्थांना सांगितली. पोलीस पाटील मारुती लोभी यांनी याबाबत पोलीस ठाण्याला कळविले.
घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे आणि कर्मचारी तसेच नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. ऐश्वर्या पवार घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थ व कामगारांच्या मदतीने मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांनी, डॉक्टरांनी पाहणी केल्यानंतर या महिलेचा खून करून मृतदेह पुरण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, अलिबाग येथून श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
>आरोपींचा शोध सुरू
माळावर गावातील मुले क्रिकेट खेळत होती. त्यातील एकाने बॉल जोरदार मारल्याने तो बाजूच्या झाडीत गेला. बॉल शोधत असताना त्यांना दुर्गंधी आली. तेथे जमिनीतून बाहेर मानवी कवटी असल्याचे दिसले. या महिलेचा खून कोणी केला, कोणत्या कारणासाठी केला याच शोध पोलीस यंत्रणा करत असल्याचे समजते.

Web Title: The body of the woman found in a rotten condition in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.