कोट्यवधींचा वित्त आराखडा

By admin | Published: December 19, 2015 02:41 AM2015-12-19T02:41:02+5:302015-12-19T02:41:02+5:30

रायगड जिल्ह्याकरिता नाबार्डकडून आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षांकरिता २ हजार ४०० कोटी रुपयांचा वित्त आराखडा, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली

Billions of finance plans | कोट्यवधींचा वित्त आराखडा

कोट्यवधींचा वित्त आराखडा

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्याकरिता नाबार्डकडून आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षांकरिता २ हजार ४०० कोटी रुपयांचा वित्त आराखडा, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत नाबार्डच्या जिल्हा विकास अधिकारी नंदा सुरवसे यांनी सादर केला.
शेतीबरोबरच लघुउद्योगांच्या बीज भांडवलासाठी २३८ कोटी रु पये व भांडवली गुंतवणुकीसाठी २८७ कोटी रु पये कर्जपुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँक कर्जामध्ये या वर्षापासून प्राधान्याने निर्यात कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, अपारंपरिक ऊर्जा व खाजगी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठ्याचा अंतर्भाव केला आहे. संभाव्य वित्त आराखड्यामध्ये निर्यात कर्जासाठी १७ कोटी, शैक्षणिक कर्जासाठी १८० कोटी, गृहकर्जासाठी १०२४ कोटी व खाजगी पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी इतका वित्तपुरवठा प्रस्तावित केला आहे. तसेच स्वयंसहाय्यता समूह, एकता देय समूह, प्रधानमंत्री जन-धन योजना इत्यादी सूक्ष्म घटकांसाठी २४.७५ कोटींची तरतूद केली आहे.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक सोमेन भट्टाचाय आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Billions of finance plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.