नागलोली येथे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:57 PM2019-02-22T23:57:25+5:302019-02-22T23:57:46+5:30

११ प्रवासी किरकोळ जखमी : चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली

Accident at Nagololi | नागलोली येथे अपघात

नागलोली येथे अपघात

Next

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथे ब्रेक फेल झाल्याने एसटीला अपघात झाल्याची घटना शुक्र वारी २२ फे ब्रुवारी रोजी घडली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. प्रवाशांना वाचविण्यात एसटी साइडपट्टीला धडकल्याने तीन प्रवाशंसह आठ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरीजवळील म्हसळा-नागलोली मार्गावर दांडगुरीकडे येताना श्रीवर्धन आगराच्या एसटीचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने वाचविण्यासाठी एसटी रस्त्याच्याकडेला आदळून अपघात झाला. या वेळी चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. एसटीमध्ये २३ प्रवासी होते. यामध्ये तन्वी बिरवाडकर (१६, रा. धनगरमलई), अनुष्का बिरवाडकर (११,रा. धनगरमलई), कुणालीदर्गे (१२), श्वेता अलीम (१५, रा. कासार कोंड), दिव्या फटकरे (१५), दीपेश अलीम (१३), शुभम तटकरे (१३), सलोनी घडशी (१५, कासार कोंड), या विद्यार्थ्यांसह पार्वती रायगवळी (७०), सुजाता मोरे (६२), प्रमोदिनी म्हामुणकर (४५, रा. खोपोली) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तत्काळ बोर्लीपंचतन येथील प्राथमिक रुग्णालयात हलवण्यात आले. एसटी प्रशासनाने किरकोळ जखमी झालेल्या प्रवासांना घटनास्थळी ५०० रुपयांची तत्काळ मदत के ली. तर वाहक विजय जगदाळे यांच्या पायाला मार लागला.
म्हसळा ते दांडगुरी व परत दांडगुरी ते धनगरमलईवरून बोर्लीपंचतन येथे येणाऱ्या एसटीचे चालक गौतम कांबळे व वाहक विजय जगदाळे हे होते. सकाळी विद्यार्थी घेऊन ही एसटी निघाली असताना नागलोली गावाच्या तीव्र उतारावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून चालकाने पुढील तीव्र उताराचे वळण न मारता सरळ बस रस्त्याच्या समोरील बाजूला खाली उतरवत झाडाला धडक देऊन थांबवली. त्यामुळे बसचे दोन्ही चाक खड्ड्यात गेल्याने प्रवाशांना झटका बसला, यात ११ जणांना किरकोळ मार लागला आहे. सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वेळी दिघी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

ग्रामीण भागात नादुरुस्त एसटी
च्ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने या भागासाठीही खराब झालेल्या तसेच आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात आहेत. रस्ता खराब तर आहेच शिवाय दुसरी पर्यायी व्यवस्थाही महामंडळाकडे नाही. या गाड्यांच्या खिडक्यांना काचा नसतात. इंडिकेटरही खराब असतात. बºयाच गाड्या तर चावीविनाच सुरू होतात. रस्ता खराब असल्याने तर या बसगाड्यांची अधिकच दुर्दशा झाली आहे. या खराब गाड्यांतून प्रवास करणे मात्र प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे.

च्धनगरमलई ते बोर्ली रस्ता अरुंद आहे. दुतर्फा प्रचंड जंगल असून या मागावर एकेरी वाहतूक मोठ्या शिताफीने होते. येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे, साळविंडे ते दांडगुरी जवळपास १३ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही.

Web Title: Accident at Nagololi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.