व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जण पळाले, केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:51 AM2017-10-27T02:51:51+5:302017-10-27T02:51:54+5:30

अलिबाग : तालुक्यातील आवास येथील व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जणांनी पलायन केले. केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

43 people escaped from the drug addicts, claiming mental and physical persecution from center operators | व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जण पळाले, केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा

व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जण पळाले, केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा

Next

अलिबाग : तालुक्यातील आवास येथील व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जणांनी पलायन केले. केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आधीही याच व्यसनमुक्ती केंद्राबाबत अशाच तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते वादाच्या भोवºयात सापडले आहे. उपचार घेणाºयांपैकी ३६ जणांना त्यांच्या नातेवाइकांनी घरी नेले आहे. सात जण अद्यापही व्यसनमुक्ती केंद्रामध्येच असल्याची माहिती मांडवा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आवास येथे गेट टू गेदर फाउंडेशनमार्फत व्यसनमुक्ती केंद्र चालवले जाते. सध्या या केंद्रामध्ये मुंबई, अलिबाग आणि मुरुड येथील ४३ जण उपचार घेतात. १७ ते ६० वयोगटातील हे सर्व आहेत. मंगळवारी त्यांनी केंद्रातील छताचे पत्रे तोडून पलायन केले होते.
>निकृष्ट दर्जाचे जेवण
बाहेर पडल्यावर ते सैरावैरा पळत सुटले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांनी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने सर्वांना मांडवा पोलीस ठाण्यात आणले. दोरीने बांधून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 43 people escaped from the drug addicts, claiming mental and physical persecution from center operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.