दारूसाठी पैसे न दिल्याने मुलगा अन् नातवाच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, येरवडा परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:11 PM2024-05-16T12:11:08+5:302024-05-16T12:11:41+5:30

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Woman dies after being beaten up by her son and grandson for not paying for liquor | दारूसाठी पैसे न दिल्याने मुलगा अन् नातवाच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, येरवडा परिसरातील घटना

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलगा अन् नातवाच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, येरवडा परिसरातील घटना

- किरण शिंदे

पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटच्या पुराने आणि नातवाने मारहाण केल्याने साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कामराज नगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ मे रोजी ही घटना घडली होती. मंगल मोहन नेटके (वय ६०) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा मयूर मोहन नेटके (वय ३०) आणि अल्पवयीन नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या अरुण वाघमारे (वय ५०) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगल मोहन नेटके या कामराज नगर परिसरात राहत होत्या. १३ मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलगा मयूर नेटके यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र मंगल नेटके यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून मुलाने आणि नातवाने मंगल नेटके यांना लाकडाने आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मंगल यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच १५ मे रोजी मंगल यांचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी कुणाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.

Web Title: Woman dies after being beaten up by her son and grandson for not paying for liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.