पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या

By अजित घस्ते | Published: October 8, 2023 06:31 PM2023-10-08T18:31:30+5:302023-10-08T18:31:43+5:30

रविवारी घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात २० ते ३० टक्के वाढ

With the start of pitru paksha leafy vegetables also became expensive | पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या

पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या

googlenewsNext

पुणे: गुलटेकडी येथील मार्केटयार्ड घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात आता पितृपंधरवडा सुरू झाल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. रविवारी घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. रविवारी (दि. ८) कोथिंबिरीची तब्बल दीड लाख, तर मेथीची ५० हजार जुडी आवक झाली आहे. तर कोथबीरची गड्डी ३० रूपये तर मेथी २५ ते ३० रूपये भावानी मिळत आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव

  कोथिंबीर : १५००-३०००, मेथी : १२००-१८००, शेपू : ६००-८००, कांदापात : ४००-१०००, चाकवत : ३००-६००, करडई : ४००- ६००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ३००-७००, मुळे : ४००-१२००, राजगिरा : ४००-६००, चुका : ४००-७००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१८००.
कोट :

''वाढत्या महागाईत जगणे महाग झाले आहे.त्यात सध्या पावासामुळे शेतात पिक नाही. तर पालेभाज्यांचे दर गगणाला भिडले आहे. सध्या  पितृपंधरवडा सुरू झाला आहे. पर्वजनाना नैवध्य द्यावा लागतो. म्हणून बाजारात रविवारी किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढल्याने सामान्यांना ते परवडत नाही.तरी खरेदी करावी लागत आहे.- वैशाली  शिंदे गृहणी''

Web Title: With the start of pitru paksha leafy vegetables also became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.