एवढी हिम्मत येते कुठून! बस थांबवून ठेवली; पोलीस समजवायला आले म्हणून कानाखाली मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 12:11 PM2024-04-14T12:11:22+5:302024-04-14T12:12:11+5:30

बसमधील वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने एक तरुण बससमोर थांबला असून, त्याने बस रोखून धरली होती

Where does such courage come from Stopped the bus When the police came to explain, she hit him under the ear | एवढी हिम्मत येते कुठून! बस थांबवून ठेवली; पोलीस समजवायला आले म्हणून कानाखाली मारली

एवढी हिम्मत येते कुठून! बस थांबवून ठेवली; पोलीस समजवायला आले म्हणून कानाखाली मारली

पुणे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसमधील वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने बस थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला समजावून सांगणाऱ्या पोलिस शिपायाला कानाखाली मारल्याचा प्रकार वारजे माळवाडी भागात घडला आहे. या प्रकरणी सुनील तुकाराम दडस (२७, रा. माण, सातारा) या प्रवासी तरुणाला अटक करण्यात आली.

याबाबत पोलिस शिपाई अमोल सुतकर यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून साताऱ्याकडे निघालेल्या प्रवासी बसमधील वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने एक तरुण बससमोर थांबला असून, त्याने बस रोखून धरली आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री वारजे पोलिसांना मिळाली. नियंत्रण कक्षाकडे याबाबतची तक्रार आल्यानंतर रात्रपाळीत गस्त घालणारे पोलिस शिपाई अमोल सुतकर आणि सहकारी पवार हे वारजे पुलावर गेले. त्यांनी प्रवासी तरुण सुनील दडसला समजावून सांगितले. दडसने सुतकर आणि पवार यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करून सुतकर यांच्या कानाखाली मारली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दडसला अटक करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

Web Title: Where does such courage come from Stopped the bus When the police came to explain, she hit him under the ear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.