मतदारांचा कौल! प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताकदीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:52 PM2019-04-04T23:52:40+5:302019-04-04T23:53:38+5:30

सलग तीन वेळा शिवसेनेलाच मतदारांचा कौल । विधानसभा निवडणुकांतही युतीनेच मारली बाजी

Voters! NCP's strength in each election is reduced | मतदारांचा कौल! प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताकदीत घट

मतदारांचा कौल! प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताकदीत घट

Next

अविनाश थोरात 
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, राष्ट्रवादीमधूनच शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि सलग तीन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. २००९ पासून राष्ट्रवादीच्या विधानसभेतील ताकदीतही घट होऊ लागली आहे. तीन आमदारांवरून २०१४ मध्ये केवळ एकच आमदारावर राष्ट्रवादीचे बळ आले आहे.

२०१४ मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळे लढले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील केवळ खेडमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. परंतु, युती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हडपसर आणि शिरूर येथील दोन आमदारांचे बळही त्यांना मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे राज्यातील एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या भोसरीच्या महेश लांडगे यांचीही समजूत काढण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. मात्र, ही सगळी ताकद कागदावर दिसत आहे. प्रत्यक्षात त्याचे मतांत रूपांतर होईल का, याबाबत
शंका आहे.

राष्ट्रवादीचा एकच आमदार असला तरी मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये राष्टÑवादीची ताकद आहे. याशिवाय २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत पक्षांतर्गत गटबाजीचा फटका राष्टÑवादीला बसला होता.
हे टाळल्यास राष्टÑवादीचे उमेदवार
डॉ. अमोल कोल्हे लढत देऊ
शकतील. कॉँग्रेसची या मतदारसंघात फार ताकद नाही.
हडपसर वगळता
इतरत्र त्यांचा प्रभाव नाही. मात्र, हडपसर आणि भोसरी येथील
मतदान निर्णायक ठरणार आहे.
शहरी भागातील मतदारांना
आकर्षित करण्यात कोण उमेदवार यशस्वी ठरतोय, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.



दोन निवडणुकांचा आढावा
मतदारसंघाचा आतापर्यंतचा सूर

चित्र बदलेल का? कसे?
च्राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व तालुक्यांतील शिलेदार एकोप्याने काम करणार का, हा प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपच्या विरोधात मतदानाची भूमिका घेतली आहे. हडपसर आणि भोसरी या शहरी भागात याचा परिणाम होऊ शकतो. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची भूमिका शिवसेनेसाठी, तर माजी आमदार विलास लांडे यांची मदत कोल्हे यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

विधानसभांचे निकाल 2009 विजयी

जागा भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतर
जुन्नर - - 44.57 48.52 6.91
आंबेगाव - - 36.41 58.17 5.42
खेड - - 26.11 38.67 35.22
शिरूर 29.42 - - 25.30 45.28
भोसरी - - 29.68 25.42 30.62
हडपसर - 33.48 39.73 - 26.79

विधानसभांचे निकाल 2014 विजयी

जागा भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतर
जुन्नर 11.40 2.37 22.02 20.59 30.61
आंबेगाव 2.38 1.24 32.08 62.12 1.11
खेड 8.28 0.88 51.59 35.24 4.01
शिरूर 42.82 1.96 7.95 37.76 9.51
भोसरी% 19.72 6.49 20.27 19.98 27.19
हडपसर 37.87 10.13 24.01 13.72 14.27



लोकसभेचे निकाल 2009
शिवसेना
57.54%
महाराष्ट्रवादी
36.24%
बसप
2.08%
इतर
4.14%

2014


शिवसेना
59.05%
राष्ट्रवादी
31.35
इतर
9.80
 

Web Title: Voters! NCP's strength in each election is reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.