Shreeram Loagoo's Death : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड; प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:02 PM2019-12-17T22:02:55+5:302019-12-17T23:28:09+5:30

Shreeram Lagoo's death : प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

veteran actor Shreeram Lagoo passes away | Shreeram Loagoo's Death : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड; प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

Shreeram Loagoo's Death : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड; प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

googlenewsNext

पुणे - प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज रात्री निधन झाले. पुण्यातील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. त्यांचे नातेवाईक परदेशातून परतल्यावर त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार होतील. श्रीराम लागू यांनी अभिनेता म्हणून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमधील कारकीर्द गाजवली होती. अभिनयासोबतच त्यांनी एक विचारवंत म्हणून तसेच  सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले होते. 

डॉ लागू यांना दीनानाथ रुग्णालयात रुग्णालयात रात्री 8. 30च्या दरम्यान भरती करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ धनंजय केळकर यांनी दिली.

डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला होता.  त्यांनी १९६९ मध्ये इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून पूर्णवेळ नाट्य अभिनेता म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली होती. त्यानंतर कुसुमाग्रज यांच्या नटसम्राट ह्या नाटकात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका साकारली होती. डॉ. लागू यांनी नाट्यक्षेत्रासोबत चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. सिंहासन, सामना, पिंजरा हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते. मराठीबरोबरच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. 

डॉक्टर श्रीराम लागू हे विज्ञाननिष्ठ होते अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यामध्ये ते आघाडीवर होते. देव हा सुद्धा अंधविश्वासाचा प्रकार आहे, असे त्यांचे मत होते. 'देवाला रिटायर करा' या लेखामधून त्यांनी देव ही संकल्पना निष्क्रीय झाली असल्याचे म्हटले होते. 

डॉ श्रीराम लागू यांचे पार्थिव गुरुवार दि. 19 रोजी अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात ठेवणार

डॉ श्रीराम लागू यांची गाजलेली नाटके 
नटसम्राट
इथे ओशाळला मृत्यू
बेबंदशाही 
अग्निपंख 
एकच प्याला
लग्नाची बेडी
सूर्य पाहिलेला माणूस

डॉ श्रीराम लागू यांचे गाजलेले चित्रपट 
सिंहासन 
सामना
पिंजरा 
आपली माणसं
गुपचूप गुपचूप
भिंगरी 
मुक्ता 
 

Web Title: veteran actor Shreeram Lagoo passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.