पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांमुळे दोन दिवसांचा ब्लॉक, प्रवाशांचे हाल

By अजित घस्ते | Published: November 25, 2023 05:58 PM2023-11-25T17:58:41+5:302023-11-25T18:01:04+5:30

तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.....

Two-day block on Pune-Mumbai railway line due to technical works, plight of passengers | पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांमुळे दोन दिवसांचा ब्लॉक, प्रवाशांचे हाल

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांमुळे दोन दिवसांचा ब्लॉक, प्रवाशांचे हाल

पुणे : हजारो प्रवाशी रेल्वेतूनपुणे- लोणावळा, मुंबई मार्गावरून जात असतात. मात्र शनिवार, रविवार पुणे रेल्वे विभाग मधील पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर–खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीच्या विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या दोन दिवसाच्या दरम्यान काही गाड्या रद्द, पुनर्निधारित वेळेवर तर काही विलंबाने धावणार आहेत. यामुळे रेल्वेतून या मार्गावरून जाणा-या प्रवाशांती गैर सोय होत असून नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्या बदलात रेल्वे विभागाने कोणतीही पर्याय व्यवस्था केली नाही. यामुळे प्रवाशाना अन्य खाजगी वाहने, एसटीने जावे लागणार असून त्रास सहन करावा लागणार आहे.

या आहेत रद्द गाड्या 

-रविवार (दि. २६) पुणे-तळेगाव-लोणावला-पुणे दरम्यान धावणा-या अप आणि डाऊन सर्व लोकल गाड्या रद्द.
-रविवार (दि. २६) पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे-मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
-मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस

पुनर्निधारित वेळाने धावणा-या गाड्या

-रविवार (दि. २६) रोजी पुणे-जयपूर एक्सप्रेस पुणे येथून १७.३० ऐवजी दोन तास विलंबाने १९.३० वाजता सुटेल.
-रविवार (दि. २६) पुणे-मुंबई एक्सप्रेस पुणे येथून १८.३५ ऐवजी १९.०० वाजता निघेल.    
-रविवार (दि. २६) पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस पुणे येथून  १८.४५ ऐवजी १९.४५ वाजता सुटेल.
-रविवार (दि. २६) दौंड-इंदौर एक्सप्रेस दौंडवरून १४.०० ऐवजी १८.०० वाजता सुटेल.
-शनिवार (दि. २५) त्रिवेंद्रम येथून सुटणारी त्रिवेंद्रम-मुंबई एक्सप्रेस त्रिवेंद्रम येथून ०४.२५ ऐवजी ०६.२५ वाजता सुटेल.
-शनिवार (दि. २५) ग्वालियर येथून सुटणारी ग्वालियर-दौंड  एक्सप्रेस १७.१५ ऐवजी १८.४५ वाजता सुटेल.

उशिराने धावणा-या गाड्या

-शनिवार (दि. २५) रोजी बंगळुुरु-मुंबई उद्यान एक्सप्रेस, बंगळुुरु-  गांधीधाम एक्सप्रेस आणि रविवार (दि. २६) रोजी मुंबई-चेन्नई एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्सप्रेस, मुंबई-भुवनेश्वर  कोणार्क एक्स्प्रेस आणि मुंबई- हैदराबाद एक्सप्रेस या गाड्या पुणे विभागात काही उशिराने धावतील.

Web Title: Two-day block on Pune-Mumbai railway line due to technical works, plight of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.