Three killed in two accidents in the Pune area | पुणे परिसरात दोन अपघातांत तीन ठार

पुणे : भरधाव वेगातील दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई द्रुतगती मार्गावर वारज्यातील मुठा नदीच्या पुलावर घडली. कोंढव्यात झालेल्या अपघातात एका इसमाच्या रॅश ड्रायव्हींगमुळे एका युवकाने आपले प्राण गमावले. हे दोनही अपघात सोमवारी पहाटे साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास घडले आहेत.
अजिंक्य शरद डुंबरे (वय २६, रघुनंदन कॉम्पलेक्स, विठ्ठलवाडी) आणि नकुल नवनीत परमार (वय २८, रा. रामबाग लेन, बोरिवली वेस्ट मुंबई) यांचा अपघातात मृत्यू झाला. निकम हे दुचाकी चालवत होते. वारजे पुलाकडून धायरीच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटला. ही घटना सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. त्यात दोघांचाही मत्यू झाल्याचे वारजे पोलिसांनी सांगितले.
कोंढवा लुल्लानगर रस्त्यावर कुबेर कॉलनी समोर पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातात फिरोज मेहबुब शेख (वय २२, साईबाबानगर कोंढवा) याला आपले प्राण गमवावे लागले. सादीक अन्सारी (वय २०, रा, कोंढवा) यांनी या प्रकरणी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी कल्याणी शरणप्पा घोटमाळे (वय ३६, रा. गंगानगर स्माशानभूमी हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अन्सारी हे, त्यांचे मित्र फिरोज शेख
व इरफान शेख यांच्यासह मोटारसायकलवरुन पहाटे साडेतीनच्या सुमारास कोंढवा लुल्लानगर रस्त्यावरुन चालले होते. त्यावेळी घोटमाळे यांनी त्यांच्या दुचाकी जवळून त्यांची मोटारसायकल वेगात नेली. त्यावेळी घोटमाळे यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने फिर्यादी यांच्यासह फिरोज आणि इरफान देखील गाडीवरुन खाली पडले.