ज्या कार्यक्रमांना सत्ताधारी नेते असतात त्यावर निर्बंध नाही का? चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 02:04 PM2021-02-19T14:04:22+5:302021-02-19T14:07:51+5:30

चर्चेपासून पळ काढण्यासाठीच सरकारला अधिवेशन जवळ आल्यावर कोरोना आठवतो अधिवेशन आलं की कोरोना आठवतो असा आरोपही पाटील यांनी केला.

Is there no restriction on the programs of the ruling party? Chandrakant Patil's attack | ज्या कार्यक्रमांना सत्ताधारी नेते असतात त्यावर निर्बंध नाही का? चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

ज्या कार्यक्रमांना सत्ताधारी नेते असतात त्यावर निर्बंध नाही का? चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Next

पुणे: सत्ताधारी नेते ज्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात त्यावर निर्बंध का नाहीत असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. चर्चेपासून पळ काढण्यासाठीच अधिवेशन आल्यानंतर कोरोना आठवतो असाही आरोप त्यांनी केला आहे. 

पुण्यामध्ये आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘ युवा वॅारियर’ या भाजप युवा मोर्चाच्या नव्या उपक्रमाला सुरुवात झाली. यापूर्वी पाटील माध्यमांशी बोलत होते. 18 ते 25 वयोगटातील युवकांना भाजप च्या राजकारणाकडे आकर्षित करण्यासाठी युवा वॉरियर्स विंग सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमापूर्वी पाटील माध्यमांशी बोलत होते. 

पाटील म्हणाले, उद्या शरद पवार,संजय राऊत वशाट  उत्सवाला येताहेत तिथं संख्येवर निर्बंध नाहीत. महाविकास आघाडी अनेक ठिकाणी आंदोलन करतंय तिथं निर्बंध नाहीत मग शिवजयंती वर निर्बंध का ? असा सवाल पाटील यांनी विचारला. 

चर्चेपासून पळ काढण्यासाठीच सरकारला अधिवेशन जवळ आल्यावर कोरोना आठवतो अधिवेशन आलं की कोरोना आठवतो असा आरोपही त्यांनी केला. 

पाटील म्हणाले ,सरकार पळ काढतय चर्चेपासून..पूजा चव्हाण ,धनंजयमुंडे, औरंगाबाद मधील पीडितेचा युवक अध्यक्ष विरोधात आक्रोश यावर तोफ डागू आम्ही त्यावर उत्तर  काय उत्तर देणार ? वाटल्यास online अधिवेशन घ्या पण 2 महिने घ्या. अर्थचक्र आत्ताच रुळावर येते आहे. परत लाॅकडाउन करु नये असं म्हणत कोरोना वाढत असताना आम्ही सरकार सोबत असू  कोरोना वाढतोय असे ते म्हणाले.

Web Title: Is there no restriction on the programs of the ruling party? Chandrakant Patil's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.