राज्यातील तापमानाचा पारा वाढणार; चंद्रपूर तापले, यंदा उकाडा जरा जास्तच जाणवतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 10:46 AM2024-05-03T10:46:19+5:302024-05-03T10:47:05+5:30

पुढील एक, दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, हवामान विभागाचा अंदाज

The temperature of the maharashtra will increase chandrapur heats up the heat is felt a little more this year | राज्यातील तापमानाचा पारा वाढणार; चंद्रपूर तापले, यंदा उकाडा जरा जास्तच जाणवतोय

राज्यातील तापमानाचा पारा वाढणार; चंद्रपूर तापले, यंदा उकाडा जरा जास्तच जाणवतोय

पुणे : राज्यामध्ये पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. ६) मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात ३ आणि ४ मे रोजी काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, तर ४ आणि ५ मे रोजी विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसची नोंदवले गेले.

मध्य प्रदेशपासून विदर्भ, मराठवाडा, ते दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, उकाडा देखील वाढला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमानात वाढ होणार असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. येत्या ४ व ५ मे रोजी तापमानात वाढ होईल. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, चंद्रपूर, अकोला भागात उष्णतेची लाट येईल, असा अंदाज देण्यात आला आहे. ६ मे पासून उष्णता कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे. राज्यात विदर्भातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेलेला आहे. बुलढाणा, गोंदिया, नागपूर, यवतमाळचे तापमान चाळीशीच्या खाली नोंदवले गेले.

राज्यातील कमाल तापमान

पुणे - ३९.७
जळगाव - ४१.४

मालेगाव - ४२.४
सोलापूर - ४२.८

मुंबई - ३३.२
अकोला - ४२.३

चंद्रपूर - ४३.०
वाशिम - ४१.८

वर्धा - ४१.५

Web Title: The temperature of the maharashtra will increase chandrapur heats up the heat is felt a little more this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.