पुण्यातील कसब्याची निवडणूक लढवणारे उमेदवार कोट्याधीश; 'भाजप' अन् 'मविआ' चे नेते गडगंज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 02:29 PM2023-02-07T14:29:07+5:302023-02-07T14:29:28+5:30

रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने दोघांची मिळून तब्बल २२ कोटींची मालमत्ता

The election of the town will be contested between millionaire leaders Leader of 'BJP' and 'MAVIA' Gadganj | पुण्यातील कसब्याची निवडणूक लढवणारे उमेदवार कोट्याधीश; 'भाजप' अन् 'मविआ' चे नेते गडगंज

पुण्यातील कसब्याची निवडणूक लढवणारे उमेदवार कोट्याधीश; 'भाजप' अन् 'मविआ' चे नेते गडगंज

googlenewsNext

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर कोट्याधीश असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून समोर आले आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ८ कोटी ३६ लाख १० हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. दोन दुचाकी, २५ तोळे सोने आहे. तसेच धंगेकर यांच्या नावे ३५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावावर ३२ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्यावर एकूण नऊ प्रलंबित खटले आहेत. तर हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे १४ कोटी ७३ लाख ३९ हजार ७२० रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे, तर ३ कोटी ८० लाख ५६ हजार ६७७ रुपयांचे कर्ज रासने आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. रासने यांच्याकडे एक इनोव्हा कार आणि एक दुचाकी वाहन आहे.

धंगेकर यांनी साेमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे. धंगेकर यांचे चालू आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न ३ लाख ३६ हजार इतके आहे. त्यांचा शेती व सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम हा व्यवसाय आहे. यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. धंगेकर यांची जंगम मालमत्ता ४७ लाख ६ हजार १२८ रुपये, तर पत्नीकडे ६८ लाख ६७ हजार ३७६ रुपयांची मालमत्ता आहे. स्थावर मालमत्ता ४ कोटी ५९ लाख २७ हजार ९१६ रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे २ कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे. धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे.

रासने यांनी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली आहे. रासने हे बारावी उत्तीर्ण आहेत. ते बांधकाम व्यावसायिक असून श्रीपाद व्हेंचर्स, कीर्तीवर्धन डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्स आणि सिटीस्पेस डेव्हलपर्स एलएलपीमध्ये भागीदार आहेत. व्यवसाय, शेती, भाडे आणि मानधन असा त्यांनी उत्पन्नाचा स्त्रोत दाखविला आहे. रासने यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील गोरड म्हशिवली आणि हवेली तालुक्यातील म्हाळुंगे, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बोरघर, टाळुसरे येथे जमिनी आहेत, तर पुणे शहरातील सदाशिव पेठ व बुधवार पेठ येथे सदनिका आहेत. रासने यांच्याकडे ९ कोटी ८१ लाख ४१ हजार ३६२ रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी ८१ लाख १२ हजार ३५७ रुपये किमतीची जंगम आणि स्थावर मालमत्ता , मुलीच्या नावावर ५४ लाख आठ हजार ४२३ रुपये व मुलाच्या १ कोटी ५६ लाख ५७८ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. अशी एकूण मिळून १४ कोटी ७३ लाख ३९ हजार ७२० रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता रासने कुटुंबीयांकडे आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Web Title: The election of the town will be contested between millionaire leaders Leader of 'BJP' and 'MAVIA' Gadganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.