तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे

By राजू हिंगे | Published: July 1, 2023 04:56 PM2023-07-01T16:56:15+5:302023-07-01T17:20:26+5:30

आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परीक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी तरुणांना दिला

The courage shown by the youth is unparalleled 15 lakhs prizes to Jigarbaaz on behalf of the Chief Minister | तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे

तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे

googlenewsNext

पुणे : शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे,हर्षद पाटील व दिनेश मडावी या जिगरबाज तरुणांना मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे जाहीर केलेले बक्षीस सारसबाग जवळील शिवसेना भवनात पक्षाच्या प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे आणि शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी या तरुणांशी संवाद ही साधला. तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय असून या आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परीक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या तरुणांना दिला.

पिडीत तरुणीलाही तिच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत करण्यात आली, पिडीत तरुणीला ही मदत तिच्या घरी जावून देण्यात आली, तसेच तरुणीला मदत करण्यासाठी तिच्या सोबत आलेल्या मित्रालाही पंचवीस हजाराची मदत व होणाऱ्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. यानंतर शिवसेनेच्या वतीने शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवित महिला सुरक्षा धोरण ठरविण्याची मागणी करण्यात आली, पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येत असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पुण्यात नोकरीच्या निमित्याने व अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस आयुक्तांनी तातडीने उपाययोजना राबवाव्या असेही पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी सांगितले. यावेळी सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले,शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेना राज्य सचिव किरण साळी आदी उपस्थित होते. 

Web Title: The courage shown by the youth is unparalleled 15 lakhs prizes to Jigarbaaz on behalf of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.