वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट

By राजाराम लोंढे | Published: May 1, 2024 10:15 AM2024-05-01T10:15:44+5:302024-05-01T10:16:27+5:30

Lok Sabha Election 2024: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या एंट्रीने 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे गणित काहीसे विस्कळीत केले.

lok sabha election 2024 raju shetty dhairyasheel mane Satyajit Patil fight in Hatkanangle Lok Sabha Constituency | वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट

वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट

राजाराम लोंढे

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या एंट्रीने 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे गणित काहीसे विस्कळीत केले. बहुरंगी लढत होत असली तरी आघाडीचे पाटील सरुडकर, 'स्वाभिमानी'चे शेट्टी व महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांच्यातच फाइट होणार आहे. गेल्या निवडणुकीत 'वंचित'ने शेट्टींचे विजयाचे गणित बिघडविले; परंतु या निवडणुकीत तो फॅक्टर नाही. मात्र, जातीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

खासदार माने यांना पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागले. त्यात भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा करून वादळ उठवून दिले. त्यामुळे अर्ज भरेपर्यंत माने यांच्या उमेदवारीबद्दल साशंकता होती. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील समावेशावरून शेट्टी यांचाही घोळ सुरू होता. शेट्टी यांनी मशाल हातात घेण्यास नकार देताच उद्धवसेनेने सत्यजित पाटील यांना रिंगणात उतरवून लढतीचे चित्रच बदलून टाकले आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार आहे.

गाजत असलेले मुद्दे

खासदार माने यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवली आणि उद्धवसेनेची संगत सोडून शिंदेसेनेत प्रवेश केल्याचा मुद्दा प्रचारात जोरात आहे. 

या मतदारसंघात प्रथमच शाहूवाडी भागाला उमेदवारी मिळाल्याचा भावनिक मुद्दाही चर्चेत आहे.

स्वबळ शेट्टीची नाव पैलतीरी नेणार का याची उत्सुकता.

वाळवा शिराळ्यावर सरुडकरांची भिस्त

उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांनी आपली हवा तयार केली आहे. त्यांचे 'शाहूवाडी होमपिच असून, विश्वासराव नाईक साखर कारखान्यामुळे शिराळ्यात राबता आहे. आमदार जयंत पाटील यांची वाळव्यात ताकद असल्याने या मतदारसंघावरच सरुडकरांची भिस्त आहे.

एकूण मतदार-१८,०१,२०३

९,१९,६४६ पुरुष, ८,८१,४६६ महिला

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

• गतनिवडणुकीत माने यांचा विजय इचलकरंजी शहरानेच निश्चित केला; परंतु गेल्या पाच वर्षात पाणीप्रश्न 'जैसे थे' आहे.

इचलकरंजीच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या  प्रत्यक्षात काहीच पदरात नाही. वस्त्रोद्योगाबाबत घोषणांचा पाऊस; परंतु प्रत्यक्षात काहीच पदरात नाही.

पंचगंगा प्रदूषणाचे चटके या मतदारसंघाला जास्त बसतात; परंतु त्याबाबतीतही पाच वर्षात 3 काही झाले नाही.

शाहूवाडी, पन्हाळा भागात औद्योगिक प्रकल्प नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही.

कारखानदारांची भूमिका

 'हातकणंगले'त दहा साखर कारखाने असून, ही ताकद सरुडकर व धैर्यशील माने यांच्यात विभागणार आहे. शेवटच्या क्षणी अंदाज घेऊन कारखानदार करणारी 'साखर पेरणीच निर्णायक ठरू शकते.

२०१९ मध्ये काय घडले?

धैर्यशील माने   शिवसेना ५,८५,७७६

राजू शेट्टी     स्वाभिमानी-४,८९७३०

असलम सय्यद-- वंचित--१,२३,७७६

Web Title: lok sabha election 2024 raju shetty dhairyasheel mane Satyajit Patil fight in Hatkanangle Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.