भुरभुर पावसाने मोडली लोकांची हाडे; शहरात १० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना

By विवेक भुसे | Published: January 9, 2024 10:50 AM2024-01-09T10:50:31+5:302024-01-09T10:50:49+5:30

वाहनचालकांनी विशेषत: दुचाकीस्वारांनी वाहने सावकाश चालवावी, ओल्या रस्त्यावरुन जाताना काळजी घ्यावी

The bones of the people were broken by the torrential rain Incidents of bike falling at 10 places in the city | भुरभुर पावसाने मोडली लोकांची हाडे; शहरात १० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना

भुरभुर पावसाने मोडली लोकांची हाडे; शहरात १० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना

पुणे: हवामानातील बदलातून पुणे शहरात सकाळी पावसाची भुरभुर आली. त्याचा परिणाम कामाला जात असलेल्या वाहनचालकांना सहन करावा लागला असून अनेक ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील किमान १० ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. रस्त्यावर वाहनांमधून ऑईल सांडलेले होते. अतिशय हलका पाऊस झाल्याने पाणी आणि ऑईल यांचे मिश्रण झाल्याने छोटी चाके असलेल्या स्कुटरेट त्यावरुन जाताच त्यांची रस्त्यावरील पकड सैल होते व चाक ऑईलमुळे घसरते. 

सेनापती बापट रोडवरील सिंबायोसिसवरील उतारावर सकाळी अनेक वाहने घसरली. काही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. बिबवेवाडी, फातिमानगर, कात्रज येथील राजीव गांधी उद्यानासमोर, वानवडी, राजभवन समोरील रोड, म्हात्रे पुलाजवळ अशा जवळपास १० ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. वाहनचालकांनी विशेषत: दुचाकीस्वारांनी वाहने सावकाश चालवावी, ओल्या रस्त्यावरुन जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: The bones of the people were broken by the torrential rain Incidents of bike falling at 10 places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.