"तपास यंत्रणांची दहशत"; नातवावरील कारवाईनंतर शरद पवारांनी दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:40 AM2024-03-11T10:40:23+5:302024-03-11T10:48:04+5:30

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोतील कारखान्यावर कारवाई करण्यात आली. त्यानुसार, ईडीकडून रोहित पवार यांच्या मालकीची तब्बल ५० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली.

terror of investigative agencies; After the action against Rohit Pawar, Sharad Pawar gave the statistics | "तपास यंत्रणांची दहशत"; नातवावरील कारवाईनंतर शरद पवारांनी दिली आकडेवारी

"तपास यंत्रणांची दहशत"; नातवावरील कारवाईनंतर शरद पवारांनी दिली आकडेवारी

पुणे - केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा ज्या नेत्यांच्या पाठिशी आहे, त्यांचा भाजपात प्रवेश होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. नुकतेच, आमदार रविंद्र वायकर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवेसना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतरही या चर्चेला उधाण आले असून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोमधील कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाचा हा केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे मी आता भाजपात प्रवेश केला पाहिजे का, असेही त्यांनी म्हटलं होतं. रोहित पवार यांच्यावरील कारवाईनंतर राष्ट्रवादी शप पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रथमच भूमिका मांडली. यावेळी, ईडीचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी होत असल्याचं पवार यांनी म्हटलं.   

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोतील कारखान्यावर कारवाई करण्यात आली. त्यानुसार, ईडीकडून रोहित पवार यांच्या मालकीची तब्बल ५० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन विरोधकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट देण्यात आल्यानंतर कन्नड कारखान्याला जप्तीची नोटीस दिली आहे. पक्षफुटीनंतर माझ्याविरोधातील कारवाईला जोर आला आहे. मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. तरूंगात टाकले तरी माझी लढाई सुरू राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. आता, रोहित पवार यांच्यावरील कारवाईवर शरद पवार यांनी थेट भाष्य करत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

ईडीचा वापर करुन दहशत माजवण्याचं काम केंद्र सरकारकडून होत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. देशभरात ईडीने कारवाई केलेल्यांपैकी ८५ टक्के विरोधी पक्षातील राजकीय नेते आहेत. त्यामुळे, ईडीची कारवाई केवळ विरोधकांवरच कशी? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. ईडीवर केंद्र सरकार दरवर्षी ४०४ कोटी रुपये खर्च करते. ईडीकडून दाखल झालेल्या एकूण ५,९०६ खटल्यांपैकी केवळ २५ खटल्यांमध्ये निर्णय झाल्याचं सांगत शरद पवार यांनी थेट आकडेवारीच माध्यमांसमोर मांडली. 

एजन्सीचा वापर करुन भीती दाखवत आहेत - सुळे

ईडीच्या कारवाईबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी कारवाई होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्या म्हणाल्या, सुडाचे राजकारण इतकी पातळी गाठेल असे वाटलं नव्हतं. एखादा युवक संविधानाच्या चौकटीत राहून भाषण करतो, त्यावर कारवाई होणे दुर्दैवी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केली आहे. ही कारवाई करण्याच टायमिंग बघा. लोकांचा कल त्यांच्या बाजूने नसला तर एजन्सीचा वापर करून भीती दाखवत आहेत. लोकशाहीचा हा विरोधाभास आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

कारखान्यावर ईडीची टाच

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कंपनीशी संबंधित मनी लाॅंड्रिंग प्रकरणात कंपनीच्या मालकीच्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची ५०.२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने कारखान्याशी संबंधित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे असलेली १६१.३० एकर जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे. 
 

Web Title: terror of investigative agencies; After the action against Rohit Pawar, Sharad Pawar gave the statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.