टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, इंदापुरातील विठ्ठलवाडीत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:01 PM2017-10-01T13:01:05+5:302017-10-01T13:12:07+5:30

टेम्पोची धडक बसून दुसºया दुचाकीवर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

tempo dashing two wheeler, accident in Indapur | टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, इंदापुरातील विठ्ठलवाडीत अपघात

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, इंदापुरातील विठ्ठलवाडीत अपघात

Next
ठळक मुद्देऐन दसºयाच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर अकलूज रस्त्यावर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली.इस्माईल अजमुद्दीम शेख यांनी इंदापूर पोलिसांना या बाबत माहिती दिली.इस्माईल अजमुद्दीम शेख यांच्या मुलाचा पाय मोडला. 

इंदापूर : टेम्पोची धडक बसून दुसºया दुचाकीवर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ऐन दसºयाच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर अकलूज रस्त्यावर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली.
नवनाथ माणिक नलवडे  (वय ३५, रा. नलवडेवस्ती, झगडेवाडी, ता. इंदापूर) असे मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. इस्माईल अजमुद्दीम शेख (रा. हनुमानवाडी, वडापुरी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसांना या बाबत माहिती दिली. 
ठाणे अंमलदार अरुण रासकर यांनी सांगितले, की खबर देणार शेख हे आपल्या मुलासह दुचाकीवरुन (क्र. एमएच ४२ सी १५७२) कामानिमित्त इंदापूरला निघाले होते. विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर इंदापूर कडून अकलूजच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस (क्र.एमएच ४२ एबी ८०९५) इंदापूर कडे निघालेल्या टेम्पोचा धक्का लागला. ती दुचाकी शेख यांच्या दुचाकीस धडकल्याने झालेल्या अपघातात त्या दुचाकीवरील नवनाथ नलवडे यांचा जागीच मृत्यू झाला. शेख यांच्या मुलाचा पाय मोडला. 
अधिक तपास सहायक फौजदार दत्तात्रय जाधव करीत आहेत.

Web Title: tempo dashing two wheeler, accident in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.