दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाईची मागणी, गोसावीवाडी शाळेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:16 AM2018-12-28T00:16:00+5:302018-12-28T00:16:31+5:30

गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांविनाच अध्ययन करण्याची वेळ आली होती.

teachers news | दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाईची मागणी, गोसावीवाडी शाळेतील प्रकार

दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाईची मागणी, गोसावीवाडी शाळेतील प्रकार

googlenewsNext

कळस : गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांविनाच अध्ययन करण्याची वेळ आली होती.
या प्रकरामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून, संबंधित दोन्ही शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील कळस केंद्रातील गोसावीवाडी शाळेत २१ मुले शिक्षण घेत आहेत. याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, सोमवारपासून एक शिक्षक शाळेकडे फिरकलाच नाही. एक शिक्षक सकाळी येऊन येथील वर्ग खोल्यांचे कुलूप उघडून थोडावेळ थांबून गावाकडे निघून गेला. दुपारी तीन वाजेपर्यंत शिक्षकाविना विद्यार्थी शाळेत बसून होते.
ग्रामस्थांना याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. त्या वेळी ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पालकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
लोकसहभागातून शाळेचे ग्रामस्थांनी रूप पालटले आहे. तसेच विविध सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत असतानाच शिक्षकच कुठलीही कल्पन न देता गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यायचा, असा सवालही या वेळी पालकांनी उपस्थित केला.

याठिकाणी दोन शिक्षक आहेत. मात्र आज एकही शिक्षक शाळेत दुपारी तीन वाजेपर्यंत दिसून आला नाही. मुलांना विचारले असता त्यांनी गुरुजी येऊन गेल्याचे सांगितले. आम्ही पाच ते सहा ग्रामस्थांनी शाळेत येऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
- अंबादास गावडे,
ग्रामस्थ

शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती ढासळली आहे. शिक्षक कधीही येतात, कधीही जातात. आज घडलेला प्रकार खरा आहे. त्यांनी झालेल्या चुकीबद्दल ग्रामस्थांसमोर माफी मागितली आहे.
- कैलास गावडे,
शाळा समिती अध्यक्ष

Web Title: teachers news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे