तलाव भरण्यासाठी ‘टेल टू हेड’, पालकमंत्र्यांच्या सूचना, पाणीवापराबाबत नियोजन, यंदा ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 02:53 AM2017-09-13T02:53:04+5:302017-09-13T02:53:04+5:30

खडकवासला प्रकल्पांतर्गत २०१७-१८च्या खरीप हंगामातील पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील एकूण ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पाणी नियोजन करण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व तलाव भरून देण्याची मागणी केली, तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तलाव भरण्याच्या तसेच ‘टेल टू हेड’ पाणी देण्याबाबत अधिका-यांना सूचना केल्या.

Tail-to-head to fill the lake, instructions of Guardian Minister, planning for using water, planning for 50 thousand 758 hectare area | तलाव भरण्यासाठी ‘टेल टू हेड’, पालकमंत्र्यांच्या सूचना, पाणीवापराबाबत नियोजन, यंदा ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन  

तलाव भरण्यासाठी ‘टेल टू हेड’, पालकमंत्र्यांच्या सूचना, पाणीवापराबाबत नियोजन, यंदा ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन  

googlenewsNext

बारामती : खडकवासला प्रकल्पांतर्गत २०१७-१८च्या खरीप हंगामातील पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील एकूण ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पाणी नियोजन करण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व तलाव भरून देण्याची मागणी केली, तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तलाव भरण्याच्या तसेच ‘टेल टू हेड’ पाणी देण्याबाबत अधिका-यांना सूचना केल्या.
खडकवासला प्रकल्पांतर्गत खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांतील पाणी खडकवासलाच्या नवीन मुठा कालव्यामार्फत हवेली, दौंड, इंदापूर व बारामती या चार तालुक्यांतील ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राला यंदा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या कालव्यामधून वरवंड व शिर्सुफळ तलावात पाणी सोडून त्याद्वारे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे १३ हजार ८३५ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची तरतूद प्रकल्प अहवालामध्ये आहे. यामध्ये सणसर जोड कालव्यावरील ११ हजार ३८८ हेक्टर क्षेत्र मात्र या नियोजनात समावेश करण्यात आलेला नाही. हवेली तालुक्यातील ५ हजार ७८५ हेक्टर, दौंड तालुक्यातील २८ हजार ५५ हेक्टर क्षेत्र, बारामती तालुक्यातील ९८० हेक्टर क्षेत्र व इंदापूर तालुक्यातील १५ हजार ९३८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या शिवाय पुणे शहर, दौंड, इंदापूर नगरपालिका व २२ ग्रामपंचायती, ९२ संस्थांना पिण्यासाठी व ३१ संस्थांना औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जाते.
यंदाच्या वर्षी पुणे महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी ५ टीएमसी पाणी एका वर्षामध्ये वापरास शासनाची मान्यता आहे, तर अतिरिक्त लोकसंख्येला ६.५ टीएमसी असा एकूण ११.५० टीएमसी पाणी वापरास मंजुरी आहे. सध्या पुणे महानगरपालिकेकडून १ हजार ३५० एमएलडी पाणी दररोज वापरण्यात येत आहे. त्यानुसार ९३ दिवसांसाठी ४.३७ टीएमसी पाणी खडकवासलामधून पुणे महानगरपालिका वापरणार आहे. परिणामी, शासन मान्यतेपेक्षा १.४२ टीएमसी पाणी पुणे महानगरपालिका जास्ता वापरणार आहे. धरणामध्ये ६६ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून २२ जुलै २०१७ ला आवर्तन सुरू करण्यात आले होते.
खरीप हंगामासाठी ५.४६ टीएमसी, बिगर सिंचनासाठी ०.१४ टीएमसी, तर वरवंड व शिर्सुफळ तलाव भरण्यासाठी ०.२८ टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव होता. यापैकी धरणातून २२ जुलै ते १० सप्टेंबर दरम्यान ६.०५ टीएमसी पाणीवापर झाला आहे.
खरीप हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर, सांडव्यावरून पाणी वाहत असल्यास खरिपाचे दुसरे आवर्तन सलगपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, जर पावसाचा जोर कमी झाला व सांडव्यावरून पाणी वाहने बंद झाले तर सिंचनाच्या गरजेनुसारच धरण १०० टक्के भरल्यानंतर, दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार अजित पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार दत्तात्रय भरणे, जयदेव गायकवाड, राहुल कुल, बाबूराव पाचर्णे, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, खडकवासला विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

रब्बी व खरीप हंगामातील सिंचनावर ताण

खडकवासला प्रकल्पातून पुणे महानगरपालिका पिण्याच्या पाण्यासाठी वार्षिक १६.५० टीएमसी इतके पाणी वापरते. पुणे महानगरपालिका मंजुरीपेक्षा ५ टीएमसी पाणी जास्त वापरत आहे. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामातील सिंचनावर ताण येत आहे. यंदाच्या वर्षी टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
शासनाच्या तज्ज्ञ समितीने ६९५ मीटरपर्यंतच पाणीपातळी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदा टेमघरमध्ये १.७५ टीएमसी पाणीसाठा कमी असणार
आहे. त्यामुळे काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.

५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राला यंदा पाणी देण्याचे उद्दिष्ट.
जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे १३ हजार ८३५ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची तरतूद.
पुणे महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी ५ टीएमसी पाणी एका वर्षामध्ये वापरास शासनाची मान्यता.
सध्या पुणे महानगरपालिकेकडून १ हजार ३५० एमएलडी पाणी दररोज वापरण्यात येत आहे.

Web Title: Tail-to-head to fill the lake, instructions of Guardian Minister, planning for using water, planning for 50 thousand 758 hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.