सणसवाडी येथे ग्रामस्थांना सुरेश सकटकडून शिवीगाळ व धमकी, ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 07:36 PM2018-04-25T19:36:06+5:302018-04-25T19:36:06+5:30

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे पूजा सुरेश सकट हिने आत्महत्या केली असल्याची घटना घडली. दरम्यान पूजाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Stop the streets from villagers, scaring and threatening residents of Sanaswadi by suresh sakat | सणसवाडी येथे ग्रामस्थांना सुरेश सकटकडून शिवीगाळ व धमकी, ग्रामस्थांचा रास्ता रोको

सणसवाडी येथे ग्रामस्थांना सुरेश सकटकडून शिवीगाळ व धमकी, ग्रामस्थांचा रास्ता रोको

googlenewsNext
ठळक मुद्देसंतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको व व्यवहार बंद ठेऊन घटनेचा निषेध सुरेश सकट यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता.शिरुर) येथे ग्रामस्थ व महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्यावरुन सणसवाडी ग्रामस्थांनी रास्ता रोको व गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. सुरेश सकट यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, दुपारनंतर जनजीवन सुरळीत होण्यास मदत झाली. 
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे पूजा सुरेश सकट हिने आत्महत्या केली असल्याची घटना घडली. दरम्यान पूजाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सकट कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आज सकाळी सणसवाडीच्या माजी सरपंच आशा दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, रामभाऊ दरेकर यांसह इतर चार ते पाच इसम सणसवाडी चौकात थांबले असताना त्याठिकाणी मयत पूजाचे वडील सुरेश सकट त्यांना संरक्षणासाठी असलेल्या स्टेनगण वाल्या पोलिसांसह एका दुचाकीवरून चौकात आले. त्यानंतर त्याने आशा दरेकर यांना शिवीगाळ केली. त्यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव यांनी सकट याला समजावण्याचा प्रयत्न केला असता तो त्याला देखील न जुमानता सकट याने अश्लील शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनतर दत्तात्रय हरगुडे , पंडीत दरेकर , युवराज दरेकर , वैभव यादव, शिवाजी दरेकर ,  आशा दरेकर, पुष्पा दरेकर, नामदेव दरेकर, युवराज दरेकर, नवनाथ हरगुडे, रामदास दरेकर, अ‍ॅड. विजयराज दरेकर, बाबासाहेब दरेकर, रमन दरेकर, नवनाथ दरेकर, गणेश सातपुते यांसह सणसवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी सणसवाडी चौकात पुणे नगर रस्त्यावर ठिय्या मांडला.
यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको केला तर ग्रामस्थांनी व्यवहार बंद ठेऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. यानंतर आशा सोमनाथ दरेकर (रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी सुरेश सकट यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 
कायदा सुव्यवस्था राहिली नाही 
कोरेगाव भीमा -सणसवाडी येथील १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीमुळे परिसरात अशांतता पसरली आहे. आजही नागरिक तणावाखाली असताना परिसरात वारंवार अनुचित प्रकार घडत असल्याने याठिकाणी कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुम मांढरे यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन याबाबत ठोस पावले का उचलत नाही असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Stop the streets from villagers, scaring and threatening residents of Sanaswadi by suresh sakat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.