राज्य राखीव पोलीस जवानांकडून सायकल प्रवासातून समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:29 PM2019-01-08T23:29:13+5:302019-01-08T23:29:27+5:30

दौंड ते सिद्धटेक रॅली : पोलीस स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Social security from state-run police jaws | राज्य राखीव पोलीस जवानांकडून सायकल प्रवासातून समाजप्रबोधन

राज्य राखीव पोलीस जवानांकडून सायकल प्रवासातून समाजप्रबोधन

googlenewsNext

दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ आणि ५ च्या वतीने पोलीस दिनाचे औैचित्य साधून दौैंड ते सिद्धटेक प्रबोधन सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीतून ‘बेटी बचाव’, ‘निसर्गसंवर्धन’, ‘स्त्रीजन्माचे स्वागत’ यांसह अन्य सामाजिक विषयांबाबत प्रबोधन करण्यात आले. प्रवासादरम्यान सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे फलक सायकलला लावले होते.

समादेशक श्रीकांत पाठक, समादेशक तानाजी चिखले यांच्यासह एसआरपी जवान सायकल रॅलीत सहभागी झाले होते. प्रवासात ठिकठिकाणी ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले. दौंड ते सिद्धटेक मार्गात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. दौंड येथील शिवाजी चौैकात दौंड पोलीस ठाणे, कि. गु. कटारिया महाविद्यालय, कन्या विद्यालय, शेजो विद्यालयाच्या, तसेच अ‍ॅशवुड हॉस्पिटलच्यावतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, डॉ. पी. बी. पवार, शालिनी पवार, प्राचार्य सुभाष समुद्रे, शरद जगताप, आबा मुळे, विकास शेलार, श्रीकृष्ण ननवरे, रामेश्वर मंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रवासादरम्यान स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण हा कार्यक्रमही करण्यात आला. विविध शाळेतील १५०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना शस्त्राची माहितीदेखील देऊन
विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

सायकल चालविणे उत्तम व्यायाम
आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे. तेव्हा सायकलीने प्रवास करून समाजप्रबोधन करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून राज्य राखीव पोलीस दलाचे जवान करीत असतात. पर्यावरणाचा ºहास टाळावा, स्त्रीजन्माचे स्वागत यासह अन्य काही सामाजिक प्रबोधन या रॅलीतून करण्यात आले.
- श्रीकांत पाठक, समादेशक ग्रुप क्र . ७

निसर्गसंवर्धन गरजेचे
पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही. वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून जवानांच्या माध्यमातून विविध उपक्रमात निसर्ग पर्यावरणाचे संदेश दिले जातात. त्यातूनच निसर्गाचे संवर्धन होत आहे.
- तानाजी चिखले, समादेशक : ग्रुप क्र. ५
 

Web Title: Social security from state-run police jaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.