अवयवदानातून सामाजिक जाणीवेची जनजागृती : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 05:53 PM2018-09-02T17:53:59+5:302018-09-02T17:56:06+5:30

श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्यावतीने अवयवदानविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गिरीश बापट यांनी अवयवदानाचे महत्त्व विषद केले.

social awarness throw organ donaation : girish bapat | अवयवदानातून सामाजिक जाणीवेची जनजागृती : गिरीश बापट

अवयवदानातून सामाजिक जाणीवेची जनजागृती : गिरीश बापट

पुणे : अवयवदान हा समाजाचा आदर्शवत उपक्रम आहे. अवयवदानची मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. समाजात सध्या अवयवदानाकरिता पोषक वातावरण आहे. अवयवदानाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेची जनजागृती होत असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्यावतीने अवयवदानविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या नाट्यमहोत्सवातील कलाकारांसह उपस्थित नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बापट बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार डॉ. निलीम गो-हे, महेश कर्पे, रवींद्र अनासपूरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल, मनसे नेते किशोर शिंदे, माजी नगरसेवक शाम देशपांडे, रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, डॉ. राजेंद्र खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

बापट म्हणाले, डॉक्टर आपल्या सेवेतून अवयवदान याकरिता वेळ देतात. याबद्द्ल त्यांचे विशेष कौतुक करावे लागेल. अवयवदानाबाबत आपला दृष्टीकोन महत्वाचा असून भविष्यात अवयवदान ही चळवळ झाल्यास त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. अनेकदा रक्तदान, नेत्रदान, यासारख्या आरोग्यविषयक दानसोहळ्याचे आयोजन केले जाते. मात्र त्यातून सकारात्मक संदेश व दृष्टीकोन नागरिकांपर्यत पोहचणे गरजेचे आहे. त्याशिवाय समाजात अवयवदानाची चळवळ प्रभावी होणार नाही. सरकारने देखील लोकांकरिता वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने न झाल्यास त्याचा नकारात्मक संदेश समाजात जातो.  डॉ. गो-हे यांनी भविष्यात समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदाना इतकेच अवयवदान देखील होणे महत्वाचे आहे. असा संदेश पोहचल्यास त्या उपक्रमाला हातभार लागेल.

 यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच पुणे ब्लड बँकेच्यावतीने केरळ येथील आपत्तीग्रस्तांकरिता 25 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली. 

Web Title: social awarness throw organ donaation : girish bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.