पुणे: उरूळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एक प्रवासी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:42 AM2022-09-19T11:42:01+5:302022-09-19T11:44:48+5:30

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली...

Shivshahi st bus and container mishap at Uruli Devachi; One passenger was killed on the spot | पुणे: उरूळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एक प्रवासी जागीच ठार

पुणे: उरूळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एक प्रवासी जागीच ठार

googlenewsNext

हडपसर (पुणे): फुरसुंगी-सासवड रस्त्यावर उरूळी देवाची येथे शिवशाही एसटी बस व कंटेनरची धडक झाली. या धडकेत बसमधील एक प्रवासी जागेवरच ठार झाला तर पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. येथील सोनाई हॉटेलसमोर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे-सासवड रोडवरील उरळी देवाची फाट्याजवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर सासवड रस्त्यावर येत होता. त्यावेळी भरधाव पुण्याच्या दिशेने येत असलेल्या पंढरपूर-पुणे शिवशाही एसटी बस आडव्या आलेल्या कंटेनरला जोरदारपणे धडकली. या अपघातात एसटी चालक व प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. पोलीस, अग्निशामक दल व हडपसर तसेच परिसरातील कार्यकर्त्यांनी जखमींना बाहेर घेऊन रूग्णवाहिकेतून रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हडपसर येथील सामाजिक कार्यकर्ते उल्हास तुपे, दीपक गायकवाड, हर्षल भोसले स्वराज मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मदत कार्यासाठी आले आहेत. तेथे जखमींना मदत करीत आहेत. क्रेन अग्निशामक दल आणि रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मदत करण्यात येत आहे.

Web Title: Shivshahi st bus and container mishap at Uruli Devachi; One passenger was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.