शशीजींची कर्करोग रुग्णांवरही मायेची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:04 AM2017-12-05T07:04:31+5:302017-12-05T07:04:31+5:30

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल

Shashiji's cancer patients | शशीजींची कर्करोग रुग्णांवरही मायेची फुंकर

शशीजींची कर्करोग रुग्णांवरही मायेची फुंकर

googlenewsNext

विश्वास खोड 
पुणे : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल, तर ते लोणीमधील बंगल्यात मुक्कामी असत. लोणी हे त्यांचे आवडते ठिकाण होते. कर्करुग्णांना भेटण्यासाठी, मदत करण्यासाठी हा संवेदनशील मनाचा अभिनेता मंगळवार पेठेत अनेकदा आल्याचीही आठवण आहे.
राज कपूर यांनी लोणीमध्ये जमीन खरेदी करून स्टुडिओ बांधला. निसर्गरम्य अशा या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रणही झाले आहे. लोणी काळभोरमधील एका शाळेला स्व. पृथ्वीराज कपूर यांचे नाव राज कपूर यांच्या आग्रहावरून देण्यात आले आहे. राज कपूर यांचा या गावातील तालेवार मंडळींकडे अधूनमधून राबता असे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य रामचंद्र काळभोर यांच्याकडे
ते भोजनासाठीही आल्याची आठवण आहे.
शशी कपूर कर्करुग्णासांठी काम करणाºया ‘सिप्ला’ संस्थेशीही संलग्न होते. अशा रुग्णांना ते स्वत: भेटून दिलासा देत असत. सुमारे १२ वर्षांपूर्वी पुण्यात राहणाºया शकुंतला बारणे (५७, मंगळवार पेठ) नामक महिलेला भेटण्यासाठी आपण शशी कपूर यांच्यासमवेत गेलो एका वाड्यात गेलो होतो, अशी आठवण रामचंद्र काळभोर (वय ८५) यांना आहे. या बाबतीत अधिक आठवण नमूद करताना या वाड्यातील रजनी वसंत खेडेकर म्हणाल्या, की मी काँग्रेस कार्यकर्ता असल्याने मला शशी कपूर यांच्या उदारपणाची माहिती होते. शकुंतला बारणे यांना भेटण्यासाठी शशीजी स्वत: तीन वेळा आले. त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना ते अशा रुग्णांकडे पाठवीत असत. स्वत: दूध, औषधांसाठी खर्च करीत असत.


वालचंदनगरमध्ये ‘कलियुग’चे चित्रीकरण
इंदापूर : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर सन १९८० -८१ मध्ये त्यांच्या 'कलियुग' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तालुक्यातील औद्योगिक नगरी असणाºया वालचंदनगर येथे आले होते. गडद रंगाच्या उंची सुटाबुटात समोर आलेल्या त्या वेळच्या या देखण्या, उंचपुºया व सडसडीत देहयष्टीच्या मात्र कमालीच्या ऊर्जावान अभिनेत्याची वालचंदनगरवासीयांवर पडलेली छाप आजही अमीट आहे.
शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर कँडल त्यांच्यासमवेत आल्या होत्या. वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या साखर कारखान्यात चित्रीकरण झाले होते. ते आटोपल्यानंतर तेथेच त्यांनी स्थानिक कामगारांशी आपुलकीने संवाद साधला होता. त्यांना पाहण्यासाठी आलेल्या जनसमुदायासदेखील त्यांनी नाराज केले नव्हते.
साधारणत: दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विनोदनालयाच्या पटांगणात असणाºया विस्तीर्ण मंचावर येऊन त्यांनी वालचंदनगरकरांचे स्वागत स्वीकारलेच; त्याबरोबर रसिकांच्या पाठबळावर आपण यशस्वी झालो, असे सांगत चित्ररसिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांची मने जिंकली होती. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात वालचंदनगरमधील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अ‍ॅथलीट अर्जुन गायकवाड, कुस्तीपटू तथा उद्योजक उत्तम फडतरे व इतरांचा कपूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.

Web Title: Shashiji's cancer patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.