पुण्यातील या सात ठिकाणी मिळणारे चाॅकलेट पान तुम्ही खाल्ले का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:30 AM2018-03-28T10:30:00+5:302018-03-28T10:30:00+5:30

चहा प्रमाणेच पुणेकर हे पानाचे ही माेठे शाैकिन अाहेत. पुणेकरांच्या अावडीमुळे शहरात अनेक ठिकाणी फक्त पानांची असलेली दुकाने पाहायला मिळतात. अश्याच पुणेकरांमध्ये फेमस असलेल्या सात पान शाॅपला तुम्ही एकदा भेट द्यायला हवी.

seven places in pune famous for chocolate pan | पुण्यातील या सात ठिकाणी मिळणारे चाॅकलेट पान तुम्ही खाल्ले का ?

पुण्यातील या सात ठिकाणी मिळणारे चाॅकलेट पान तुम्ही खाल्ले का ?

googlenewsNext

पुणे : अापल्या देशात पानाची परंपरा माेठी अाहे, अाणि हाे पान खाणाऱ्यांची सुद्धा. राजे-महाराजेंच्या काळापासून अापल्याकडे पान खाल्ले जाते. प्रत्येक ठिकाणच्या पानाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. पुण्यातही पान खाणाऱ्या शाैकिनांची संख्याही अधिक अाहे. यात मुलीही मागे नाहीत. पुण्यात विविध ठिकाणी मिळणाऱ्या चाॅकलेट पानाची तरुणांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. तुम्ही जर चाॅकलेट पानाचे चाहते असाल, तर पुढील चार ठिकाणचे चाॅकलेट पान तुम्ही नक्की ट्राय करा. 

शाैकिन
पानाच्या वैशिष्ट्याप्रमाणे या दुकानाचे नावही तसेच अाहे. शाैकिनचे पान पुणेकरांमध्ये प्रसिद्ध अाहे. नळस्टाॅपच्या चाैकात शाैकिन पान शाॅपचे दुकान अाहे. शाैकिनने सुरुवातीला चाॅकलेट पान विकण्यास सुरुवात केली. इतर ठिकाणपेक्षा येथील पानाची साईज त्यांनी लहानच ठेवली अाहे. दिसायला साधं मात्र उत्तम असं पान या ठिकाणी तुम्हाला मिळतं. 

चाॅकलेट स्टाेरी अाैंध 
येथे चाॅकलेटचे विविध पदार्थ मिळत असले तरी येथील चाॅकलेट पान ही खासियत अाहे. या दुकानातील सजावटीप्रमाणेच येथील पान सजवलेले असते. या पान शाॅपमुळे उपनगरात राहणाऱ्या पान शाैकिंनाना एक चांगला कट्टा मिळाला अाहे. 

नाद पान मयूर काॅलनी
नावाप्रमाणेच येथील पान तुम्हाला नाद लावल्याशिवाय राहत नाही. येथील सर्वच पान उत्तम असतात. येथे मिळणाऱ्या स्पेशल पानांचे अनेक चाहते अाहेत. येथील पांढरे चाॅकलेट पानही खूप फेमस अाहे. त्यामुळे तुम्ही येथे अजून भेट दिली नसेल तर अाजचं भेट द्या. 

एफसी राेडवरील चाॅकलेट पान
तुरुणाईचं हाॅट डेस्टिनेशन असलेल्या एफसी राेडवर मिळणाऱ्या चाॅकलेट पानाची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ अाहे. विकेंडला तर येथे माेठी गर्दी असते. या रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर हाॅटेल्स असल्याने डिनर नंतर चाॅकलेट पानाचा बेत अनेकांकडून अाखला जाताे. पान अाणि गप्पा असा तर काहींनी राेजचा प्लॅन केलेलाच पाहायला मिळताे. 

राॅयल्टी पान शाॅप 
प्रभात रस्त्यावर पिटर डाेनटच्या जवळ असलेल्या या पाॅन शाॅपचे चाॅकलेट पान अाणि फुलचंद पान सर्वात फेमस अाहेत. दरराेज संध्याकाळी अाणि रात्री येथे गर्दी असते. याठिकाणी रेग्युलर पान खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक अाहे. 

रुद्र पान शाॅप 
बंड गार्डन येथे मिळणारे हे पान पूर्व भागातील पुणेकरांच्या अावडीचे अाहे. स्ट्राॅबेरी, चाॅकलेट, पायनॅपल अश्या विविध फ्लेवरचे पान या ठिकाणी तुम्हाला मिळतात. सजवलेलं पान येथील नागरिकांच्या खास पसंतीचे अाहे. चाॅकलेट पानसाठी सुद्धा येथे माेठी गर्दी हाेत असते. 

सिद्धेश्वर पान शाॅप
पिंपळे साैदागर येथील नागरिकांमध्ये सिद्धेश्वर पान खूप फेमस अाहे. चाॅकलेट पासून सगळ्याप्रकारचे पान येथे तुम्हाला पाहायला मिळतात. रविवारी येथे माेठी गर्दी असते. त्यातही तरुणांची संख्या अधिक असते. 
 

Web Title: seven places in pune famous for chocolate pan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.