भाज्यांची चढ्या दराने विक्री

By admin | Published: June 3, 2017 02:47 AM2017-06-03T02:47:03+5:302017-06-03T02:47:03+5:30

सात बारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतमालाला योग्य हमी भाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी

Selling at the rate of vegetable prices | भाज्यांची चढ्या दराने विक्री

भाज्यांची चढ्या दराने विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंदननगर : सात बारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतमालाला योग्य हमी भाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, अशा एकूण सात मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. यामुळे वडगावशेरी, चंदननगरमधील भाजीमंडई ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले.
यामुळे चंदननगर छत्रपती शिवाजीमहाराज मंडई व वडगावशेरी गावठाण येथील दोन्ही मंडई ओस पडल्या आहेत. याचबरोबर वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर भागातील नागरिकांना काद्यांपासून ते विविध प्रकारच्या भाज्या व फळभाज्या बाजारातून जादा दराने खरेदी कराव्या लागत आहे.
राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचे किंवा त्यांच्या मागण्याचे गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि अखेर राज्यातील बळीराजाने बेमुदत कालावधीसाठी सुटी घेत शहराची रसद रोखली.
चंदननगर व वडगावशेरीतील भाजीमंडईत गुरुवारी रात्री एकाही शेतकऱ्याने शेतमाल बाजारात न आणल्यामुळे बाजारांचा व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बाजारात कुठल्याही प्रकाराचा भाजीपाला उपलब्ध झाला नाही.
दोन्ही बाजारातील व्यापारी व किरकोळ भाजी विक्रेत्यांनी संपाच्या अगोदर मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची साठवणूक केल्याने त्यावरच चंदननगर व वडगावशेरीतील भाजीमंडई चालू होत्या. त्यात एकाही शेतकऱ्याचा सहभाग नसल्याने बाजारात भाजीपाला न आल्याने बाजार ओस पडला होता.


बाजारात गाड्या पोहचू दिल्या नाहीत
चंदननगर बाजारात नगर रोडमार्गे येणाऱ्या शेतमालाच्या गाड्या कोरेगाव व वाघोलीतच शेतकऱ्यांनी अडविल्यामुळे त्या चंदननगर व वडगावशेरीतील बाजारात आल्याच नाही. त्यामुळे ग्राहकांची भाजी खरेदीसाठी वणवण झाली.

नागरिकांची लूट
सध्या दोन्ही बाजारांत दोन दिवसांपुरता भाजीपाला उपलब्ध आहे. मात्र शेतकऱ्यांचा संप लवकर मिटण्याची शक्यता कमी असल्याने सामन्यांची मोठी लूट होणार आहे. वाटेल त्या दराने भाज्यांची विक्री व्यापारी करू लागले आहेत.
यापारी जेवढे पैसे महिनाभरात कमवितात, तेवढेच पैसे या संपाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकडून कमवित असल्याचे नागरिकांचे मत आहे. सूर्योदय होताच उपनगरामधील गल्लीबोळात भाजीवाला; दुधवाल्याची आरोळी ऐकू येते; मात्र शुक्रवारी सकाळी उजाडल्यानंतर उपनगरात बहुतांश भागात हे दोन्ही घटक फिरकलेच नाहीत.

Web Title: Selling at the rate of vegetable prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.