नळपाणी पुरवठा योजनांना संजीवनी

By Admin | Published: April 23, 2017 04:14 AM2017-04-23T04:14:01+5:302017-04-23T04:14:01+5:30

जिल्ह्यातील ५२ गावांच्या नळपाणी पुरवठा दुरुस्ती रखडली होती. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती. जिल्हा परिषदेने नुकतेच यासाठी

Sanjivani for tap water supply schemes | नळपाणी पुरवठा योजनांना संजीवनी

नळपाणी पुरवठा योजनांना संजीवनी

googlenewsNext

पुणे : जिल्ह्यातील ५२ गावांच्या नळपाणी पुरवठा दुरुस्ती रखडली होती. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती. जिल्हा परिषदेने नुकतेच यासाठी ३ कोटी ७८ लाख ३२ हजार १५३ रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई काळात नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या नळपाणी पुरवठा योजनांना संजीवनी मिळणार आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टंचाई आढावा बैठक बोलविली होती. या वेळी जिल्हा परिषद सदस्यांनी मागणी तसे टँकरचा पुरवठा सुरू करा, बंद नळपाणीपुरवठा योजना सुरू कराव्यात, अशा विविध मागण्या केल्या होत्या. टंचाई कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ५२ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्तीची कामे मंजूर झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यातच नळपाणीपुरवठा करणाऱ्या योजना नादुरुस्त होत्या. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी परवड होत होती. नळपाणीपुरवठा करणाऱ्या योजना नादुरूस्त असल्याने काही योजना बंद होत्या, तर काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते.
जिल्हा परिषद सदस्यांनी पाणीटंचाईच्या आढावा बैठकीमध्ये टँकर सुरू करण्याचे अधिकारी तहसीलदारांना देण्यात यावे. टंचाईग्रस्त गावामध्ये हातपंपाची दुरुस्ती प्राधान्याने करावी, नव्याने विंधन विहिरी बांधाव्यात आदी मागण्या केल्या होत्या.

१२ विहिरींच्या दुरुस्तीसाठी सव्वातेरा लाख
जिल्ह्यातील गावे आणि वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी निधी मंजूर केला आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील १२ विहिरींच्या कामांसाठी १३ लाख २५ हजार २६५ रुपये मंजूर केले आहेत. यामधून बारामती तालुक्यातील गुणवडी, सत्यसाईनगर, कटफळ गावठाण, होळ गितेवस्ती, कोऱ्हाळे बु. माळशिकारेवस्ती, लाटे, बजरंगवाडी, सावळ, बालगुडेपट्टा, सदोबाचीवाडी, थोपडेवाडी, सावंतवाडी, नारोळी, कोऱ्हाळे बु. कोकणेवस्ती, सोनवडी, सुपे. तर पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी, पिंप्रा येथील विहिरींची कामे करण्यात येणार आहेत.

तालुकानिहाय नळपाणी पुरवठा
मंजूर योजना
मावळ : लष्करवाडी, वडेश्वर, खामशेत, सुधवडी, उकसान पुनर्वसन, पवळेवाडी कल्हाट, काले, नाने, मिंडेवाडी, नवलाख उंब्रे, कुसुर, वळख मुडावरे, घोणशेत,
मुळशी : कोंढुर, कोळावडे, मुठा, खारावडे, कुंभेरी.
भोर : राजघर, गोकवडी, डेहण, कोंडगाव, साळुंगण.
वेल्हा : सुरवड, देशमुखवाडी, वरसगाव, सौंडेसरपाले.
बारामती : मगरवाडी, पवईमाळ, लाटे.
इंदापुर : निरनिमगाव, कलठण नं. २, शिंदेवाडी.
दौंड : सहजपूर, लडकतवाडी गावठाण.
पुरंदर : दातेवाडी वाल्हा, गायकवाडवस्ती हरळी,
भिसेबनकर वस्ती, दवणेवाडी, धनकवडी.
खेड : मोरोशी,भलवडी, बहुल, साबळेवाडी.
जुन्नर : कुरण, राळेगण, खउकुंबे जळवंडी, सोनावळे, दर्गावाडी नं. १, हातवीज, सुरळे, नामदेवाडी आंबे, पिंपरवाडी आंबे, चिल्हेवाडी, इंगळूण, दुर्गावाडी नं. २, हातवीज, पांगुर्णेवाडी हातवीज.


तालुकानिहाय नळपाणीपुरवठा योजनांसाठी मंजूर निधी
तालुकारक्कम
मावळ १२ लाख ७७ हजार ४०३३ रुपये
मुळशी३० लाख ६० हजार ६५४ रुपये
खेड३२ लक्ष ३७ हजार ३४० रूपये
भोर२१ लाख ३५ हजार ८१० रूपये
वेल्हा१७ लाख ५४ हजार ४३३ रूपये
बारामती१४ लाख ३२ हजार ८०० रूपये
इंदापूर८ लाख ६१ हजार ७४५ रूपये
दौंड ५ लाख १५ हजार ६०० रूपये
पुरंदर६२ लाख ३८ हजार ९१८ रूपये
जुन्नर५८ लाख १७ हजार ८२० रूपये
एकूण ३ कोटी ७८ लाख ३२ हजार १५३ रूपये

Web Title: Sanjivani for tap water supply schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.