रोहित डागर ठरले उत्कृष्ट अश्वारोहक, थरारक प्रात्यक्षिकांना उपस्थितांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:05 AM2017-11-20T00:05:38+5:302017-11-20T00:05:49+5:30

पुणे : अश्वारोहणाचे चित्तथरारक खेळ, आर्मी बँडचे संचलन आणि घोडेस्वारीच्या प्रात्यक्षिकांनी रेसकोर्स येथे सुरू असलेल्या साउदर्न स्टार हॉर्स २०१७ चा समारोप झाला

Rohit Dagar became the host of the best athletic and thrilling performances | रोहित डागर ठरले उत्कृष्ट अश्वारोहक, थरारक प्रात्यक्षिकांना उपस्थितांची दाद

रोहित डागर ठरले उत्कृष्ट अश्वारोहक, थरारक प्रात्यक्षिकांना उपस्थितांची दाद

Next

पुणे : अश्वारोहणाचे चित्तथरारक खेळ, आर्मी बँडचे संचलन आणि घोडेस्वारीच्या प्रात्यक्षिकांनी रेसकोर्स येथे सुरू असलेल्या साउदर्न स्टार हॉर्स २०१७ चा समारोप झाला. राष्ट्रीय घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धेत उष्कृष्ट घोडेस्वार म्हणून वरिष्ठ गटात राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीतील लेफ्टनंट कर्नल रोहित डागर यांनी, तर कनिष्ठ गटात कॅडेट ओमकार दळवी यांनी सुवर्णपदक पटकावले.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील रेसकोर्स येथे ‘साउदर्न स्टार हॉर्स २०१७’ या अश्वारोहणाच्या स्पर्धा सुरू होत्या. रविवारी ‘ओपन जंप शो, ट्रिकी रायडिंग पिकिंग, हँकी (रूमाल) पिकिंग तसेच पोलो स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन स्पर्धेचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पी. के. हारिस उपस्थित होते. याबरोबरच लष्करातील अधिकारी, तसेच अ‍ॅक्वेस्टेरियनचे प्रमुख मान्यवर या वेळी उपस्थित होते. याबरोबर विविध शाळेतील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, तसेच नागरिक या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्टीय सुरक्षा प्रबोधिनीच्या छात्रांनी घोड्यांवरून ध्वजाचे संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर ‘ओपन जंप शो’ला सुरुवात करण्यात आली. एनडीएचे लेफ्टनंट कर्नल रोहित डागर यांनी त्यांच्या अर्जुन या अश्वाला नियंत्रित करत उभारण्यात आलेले अडथळे अलगद पार करत सुवर्णपदक पटकावले. यानंतर हवालदार राजबीर सिंग आणि खुल्या गटातून स्पर्धेत सहभागी झालेली संयोगिता कडू हे दोघे रजतपदकाचे मानकरी ठरले, तर सेना सेवा कोअरचे हवालदार सतिंदरसिंग हे कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
चिल्ड्रन रायडिंग स्पर्धेत ग्रीन फिल्ड स्कूलचा विद्यार्थी हर्षवर्धन जयंत याने सुवर्णपदक पटकावले. ग्रीन फिल्ड स्कूलच्या सिद्धार्थ अनयोग या विद्यार्थ्याने रजत, तर दिग्विजय हॉर्स अ‍ॅकॅडमीच्या सोहम फडे याने कांस्यपदक पटकावले.
<राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संघ ठरला पोलोचा मानकरी
साउदर्न स्टार हॉर्सच्या समारोपाप्रसंगी ‘पोलो’ची स्पर्धा घेण्यात आली. तोफखाना विरुद्ध राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा संघ असा सामना रंगला. अर्धा तास चाललेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या संघाने आघाडी घेतली. तोफखाना संघाविरुद्ध त्यांनी ५ गोल केले, तर तोफखाना संघ केवळ तीन गोल करू शकला. अश्वारोहणाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. ट्रिकी रायडिंग प्रकारात जमिनीवर ठेवलेले लक्ष्य वेगात येऊन छात्रांनी उचलले. ट्रीपल टेन पिकिंग आणि हँकी पिकिंग या प्रकारात घोड्यावर नियंत्रण मिळवत वेगाने येऊन तलवारीने जमिनीवरील लक्ष्य छात्रांनी उचलत रसिकांची मने जिंकली.

Web Title: Rohit Dagar became the host of the best athletic and thrilling performances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे