जुन्या भांडणाचा राग, तरुणावर शस्त्राने वार; ताडीवाला रोड परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:01 AM2024-01-01T11:01:27+5:302024-01-01T11:01:34+5:30

पुणे : पूर्ववैमनस्यातून ताडीवाला रोड परिसरात एका तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला ...

Rage of old strife, strikes young with a weapon; Incident in Tadiwala Road area | जुन्या भांडणाचा राग, तरुणावर शस्त्राने वार; ताडीवाला रोड परिसरातील घटना

जुन्या भांडणाचा राग, तरुणावर शस्त्राने वार; ताडीवाला रोड परिसरातील घटना

पुणे : पूर्ववैमनस्यातून ताडीवाला रोड परिसरात एका तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अक्षय अण्णा सातपुते (वय ३०, रा. ताडीवाला रस्ता), असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गोपी कर्णिक, त्याचा भाऊ आणि साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सातपुतेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवात अक्षयची आरोपींशी भांडणे झाली होती. त्यावेळी आरोपींनी त्याला मारहाण केली होती.

अक्षय आणि त्याचा भाचा यश सोनवणे शनिवारी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास ताडीवाला रोड परिसरातील लडकतवाडी परिसरातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. यश पळाल्याने बचावला. आरोपींनी अक्षयवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Web Title: Rage of old strife, strikes young with a weapon; Incident in Tadiwala Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.