गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदरचा एकमुखी ठराव , २ टीएमसी पाणी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 03:18 AM2017-12-31T03:18:45+5:302017-12-31T03:19:19+5:30

गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.

Purandar's euphemistic resolution for water supply, 2 TMC water demand | गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदरचा एकमुखी ठराव , २ टीएमसी पाणी देण्याची मागणी

गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदरचा एकमुखी ठराव , २ टीएमसी पाणी देण्याची मागणी

Next

खळद : गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.
शिवरी येथील शिवपार्वती लॉन्स मंगल कार्यालयात शनिवारी गुंजवणी प्रकल्पाबाबत जनसुनावणी पार पडली. यावेळी ११०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून जनसुनवाई हा याचाच एक भाग असून, या जनसुनवाईनंतर लगेचच तो मंजुरीसाठी ठेवण्यात येईल व अंतिम मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया होऊन वर्षभरात कामाला सुरुवात होईल, असे अधिकाºयांनी सांगत सहकार्याचे आवाहन केले.
जनसुनावणीला पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, हरिभाऊ लोळे,रमेश इंगळे, कैलास कामथे, दिलीप गिरमे, शिवाजीराव पवार, राजेंद्र झेंडे, बाळासाहेब थेऊरकर, अनिल जगताप, बबनराव कामथे, आत्माराम कामथे, सतीश लिंभोरे, किशोर लिंभोरे, राजाभाऊ क्षीरसागर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट, उपअभियंता दिगंबर दुबल, शिवाजी डेंगळे, शहाजी सस्ते आदींनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी प्रकल्पाची तांत्रिक व अन्य स्वरूपाची माहिती अधिकाºयांनी उपस्थितांना दिली. बंद जलवाहिनी असलेला गुंजवणी हा देशातील पहिला अत्याधुनिक प्रकल्प असल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता धुमाळ यांनी दिली. ते म्हणाले की,या प्रकल्पाला केंद्राकडून दुष्काळी निधीतून काही कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. उर्वरित तरतूद राज्य शासनाने केलेली आहे.

या जनसुनवाईदरम्यान सर्वांनी या योजनेचे स्वागत केले. मात्र, जुन्या योजनेत ज्या २५ गावांचा समावेश आहे, या गावांतील जमिनीवर सीलिंग करण्यात आले असून, आता या योजनेत नारायणपूर अंतर्गत १७ नवीन गावांचा समावेश झाला असल्याने आमचे सीलिंग कमी करून या गावांवरही सीलिंग टाकावे, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकºयांनी केली.

योजनेची वैशिष्ट्ये
३६५ दिवस २४ तास पाणी उपलब्धता
 शेतकºयांना त्यांच्या सोयीनुसार पिके घेण्याचे स्वातंत्र्य
 ठिबक किंवा पाट पद्धतीने पाणी वापरण्याची तिन्ही तालुक्यांतील शेतकºयांना मुभा.
 २४०० मि.मी. व्यासाचा पाईप
 आवश्यक तेथे स्लुईस व एअर वॉल्व्ह
 सिंचनाखालील क्षेत्र : वेल्हा - ८५० हेक्टर, भोर - ९४३५ हेक्टर, पुरंदर - १११०७ हेक्टर
 पाण्याचे प्रेशरहेड आउटलेटच्या मुखाशी असल्याने नारायणपूर उपसा सिंचन योजनेतील शेतकºयांना विद्युत पंप बसवण्याची आवश्यकता
राहणार नाही.
 ६४८५ अश्वशक्तीने होणार पंपिंग
 पाणीवापर संस्थांची निर्मिती

Web Title: Purandar's euphemistic resolution for water supply, 2 TMC water demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी