अवयवदानात राज्यात पुणे ठरले अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 04:10 AM2017-08-13T04:10:58+5:302017-08-13T04:11:12+5:30

अवयवदान मोहिमेत २०१४-१५ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले. राज्यात अवयवदानामध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. देशभरातील आकडेवारीनुसार पुणे ५४व्या, तर मुंबई ५९व्या स्थानावर आहे.

Pune tops Pune | अवयवदानात राज्यात पुणे ठरले अव्वल!

अवयवदानात राज्यात पुणे ठरले अव्वल!

Next

मुंबई : अवयवदान मोहिमेत २०१४-१५ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले. राज्यात अवयवदानामध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. देशभरातील आकडेवारीनुसार पुणे ५४व्या, तर मुंबई ५९व्या स्थानावर आहे. त्यानंतर इंदूर, सुरत आणि कोइमतूर यांनी स्थान मिळविले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
पुण्यात १९८८ मध्ये पहिले अवयवदान झाले. त्यानंतर २५ वर्षांनी नोव्हेंबर
२०१३मध्ये अवयवदान झाले. शिवाय, हृदयप्रत्यारोपणासाठीही २०१७ साल उजाडावे लागले. औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर यांनीही या क्रमवारीत स्थान मिळविले.

राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे विभागीय प्रत्यारोपण समित्या आहेत. पुणे विभागातर्फे ४२ किडनी, यकृत २८, हृदय ६ व प्रॅन्क्रियाजचे १ प्रत्यारोपण झाले. मुंबई समितीमार्फत किडनी ३४, यकृत २२, हृदय १६ आणि एका फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झाले. औरंगाबाद समितीमार्फत किडनी ६, हृदय १ तर, नागपूर विभागीय प्रत्यारोपण समितीमार्फत मूत्रपिंडे १२ व यकृत ३ असे प्रत्यारोपण झाले.

Web Title: Pune tops Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.