पुणे पोलिस अधीक्षकांच्या गाडीला कोंडीतून निघायला लागला अर्धा तास; सामान्यांना मात्र रोजचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 06:31 PM2024-03-20T18:31:26+5:302024-03-20T18:32:50+5:30

कोंडीमुळे गाडी पुढे जाऊ न शकल्याने गाडीच्या वाहकाने चक्क गाडीतून खाली उतरून वाहतूक कोंडी फोडण्याचा कसाबसा प्रयत्न...

Pune Police Superintendent's car took half an hour to get out of the jam; But common people suffer everyday | पुणे पोलिस अधीक्षकांच्या गाडीला कोंडीतून निघायला लागला अर्धा तास; सामान्यांना मात्र रोजचा त्रास

पुणे पोलिस अधीक्षकांच्या गाडीला कोंडीतून निघायला लागला अर्धा तास; सामान्यांना मात्र रोजचा त्रास

नसरापूर (पुणे) : नसरापूर (ता. भोर) बाजारपेठेतून वेल्ह्याकडे जाणाऱ्या राज्य मार्गावरील रस्त्यात चक्क पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची गाडी वाहतूक कोंडीत वीस मिनिटे अडकली. कोंडीमुळे गाडी पुढे जाऊ न शकल्याने गाडीच्या वाहकाने चक्क गाडीतून खाली उतरून वाहतूक कोंडी फोडण्याचा कसाबसा प्रयत्न केला अन् त्यातून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांची गाडी राजगड-वेल्ह्याकडे मार्गस्थ झाली. मात्र, वेल्ह्याहून पोलिस अधीक्षक पंकज देशमुख पुण्याकडे परतत असताना राजगड पोलिसांनी वाहतूक कोंडी होऊ दिली नाही.

गेल्या काही दिवसांपासून चेलाडी-नसरापूर-वेल्हा राज्य मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे विविध मार्गाने अनेक वेळा केल्या गेल्या आहेत. मात्र, राजगड पोलिस , ग्रामपंचायत व प्रशासन याकडे गांभीर्याने दखल घेत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याची असून सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. यासाठी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आहे. पर्यायाने पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना वाहतूक कोंडीचा प्रसाद मिळाला. एकदा आमदार संग्राम थोपटे माळेगाव- नसरापूर येथे कार्यक्रमासाठी जात असताना आलिशान गाडीतून उतरून चक्क दुचाकीवरून वाहतूक कोंडी फोडत कार्यक्रम स्थळी पोहोचले होते.

राजगड पोलिस ठाणे नसरापूरमधून कामथडी येथे हलविले. तेव्हापासून नसरापूरमध्ये राजगड पोलिस नसरापूर येथे फिरकतच नाहीत. जणू काही या ठिकाणी कधी काळी राजगड पोलिस ठाणे होते याची आठवणसुद्धा या पोलिसांना राहिली नाही. त्यामुळे नागरिक बाजारपेठेच्या रस्त्यात मनमानी करत वाहने रस्त्यातच उभी करून इतरत्र आपली कामे बिनधास्तपणे करीत असतात. नसरापूर पोलिस ठाण्याच्या बीटमध्ये पोलिसच येत नसल्याने तर बेशिस्त वाहनचालकांनी आडवी तिडवी वाहने लावली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून काय नसरापूरमध्ये सर्वत्र अलबेल असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Pune Police Superintendent's car took half an hour to get out of the jam; But common people suffer everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.