Pune Fashion Street Fire : कॅन्टोन्मेंटमधील न संपणारं 'अग्निकांड' ; पुन्हा प्रशासन यंत्रणेचा नाकर्तेपणा अन् ढिम्म कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:51 PM2021-03-27T20:51:18+5:302021-03-27T20:58:34+5:30

पुण्यातील फॅशन स्ट्रीट येथील आगीच्या भीषण घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.

Pune Fashion Street Fire : The never ending 'fire' accidents in Pune Cantonment; The negativity of the administration is again at stake | Pune Fashion Street Fire : कॅन्टोन्मेंटमधील न संपणारं 'अग्निकांड' ; पुन्हा प्रशासन यंत्रणेचा नाकर्तेपणा अन् ढिम्म कारभार

Pune Fashion Street Fire : कॅन्टोन्मेंटमधील न संपणारं 'अग्निकांड' ; पुन्हा प्रशासन यंत्रणेचा नाकर्तेपणा अन् ढिम्म कारभार

googlenewsNext

लष्कर: पुण्यात कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संबंध मार्केट आगीत जळून खाक झाले. कॅन्टोन्मेंट, पुुणे, पिंपरी- चिंचवड मनपा, लष्कर विभागाच्या अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर साहाय्याने पहाटे ५ वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र, कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले. पण घटनेनंतर नेमकं काय चुकलं, कुठं कमी पडलो याचा लेखाजोखा मांडताना भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर काय करायला हवं हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.....

कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट हे व्यापारी संकुल एमजी रॉड व ईस्ट स्ट्रीट रोड च्या दरम्यान जवळपास दोन एकर परिसरात अतिशय दाटीवाटीने वसलेले असून संपूर्ण फॅशन मार्केट मध्ये अनधिकृत २००० च्या वर कपडे, पादत्राण, आणि इतर एक्स सरीस ची व्यापारी दुकाने असून याच्या सभोवतलीच समृद्दी अपार्टमेंट, शहजहानंद अपार्टमेंट, कुमार बिल्डिंग, हे ईस्ट स्ट्रीट तर एम जी रीड वरील मोती बिल्डिंग ही संपूर्ण लाकडी तीन मजली विंटेज लिस्टिंग व्यापारी आणि राहवासी इमारत या मध्ये १९९७ दरम्यान बसवलेली फॅशन मार्केट आहे.

एमजी रोडवरील व्यापारी दुकानांसमोरच्या पदपथावर १९९७ पूर्वी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन येथील दुकानदार यांच्या विरोधामुळे, वाहतुकीच्या अडचणीमुळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाने १९९७ साली येथील पथारी व्यावसायिकांना कांबळे मैदान अर्थात आताचे 'फॅशन मार्केट' याठिकाणी केवळ १ वर्षाच्या करारावर ४ बाय ५ म्हणजे २० चौरस फूट इतका ओटा दिला होता. त्यावेळी विक्रेत्यांची संख्या ४७१ एवढी होती. २००६ साली त्यात १२१ गाळे वाढवण्यात आले. परंतु, आज येथील पार्किंगमध्ये देखील गाळे बसविल्याने त्याची संख्या हजारांच्या वर पोहचली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ८ या वेळेत व्यवसाय करून घरी आपापला माल घेऊन जायचं असा नियम केला आहे. त्यासाठी बोर्ड व्यावसायिकांकडून २ ते ५ रुपये इतके भाडे डॅमेज चार्ज म्हणून घेते.

२०१७ साली मुंबई येथील कमला मिल जळीतकांड नंतर २०१८ साली बोर्डाने पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या फायर ब्रिगेडला संयुक्तरित्या फॅशन मार्केट चे फायर ऑडिट करायला सांगितले.त्यावेळी या तिन्ही फायर ब्रिगेडने हे धोकादायक व्यापारी संकुल आहे, असा अहवाल बोर्डाला सादर केला होता. बोर्डाने ते अनधिकृत जाहीर केले व येथील व्यापाऱ्यांकडून घेण्यात येणारे डॅमेज चार्जेस देखील बंद केले. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही , जर कार्यवाही झाली असती तर आज ही घटना घडली नसती.
...

सुस्तावलेले अग्निशमन,विद्युत विभाग.....

ऑगस्ट २०२० ला सुरू झालेली आगीचा क्रम आज मार्च २०२१ मध्ये ही थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे आगीला शॉर्ट सर्किटचे कारण देत  जबाबदारी ढकलता येणार नाही किंवा आगीची घटना घडल्यानंतरही संबंधितांवर कुठलीच कार्यवाही न करणे याबाबत कुठलीही चौकशी समिती न बसवणे हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणाच म्हणावा लागेल. पटेल रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाला २०२० ऑगस्ट महिन्यात आग लागली होती. परंतु, शॉर्टसर्किट कारण देत जबाबदारी ढकलण्याचे काम येथील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केले. 

पुढील सहा महिन्याच्या कालावधीतच पुन्हा फेब्रुवारी २०२० ला हॉस्पिटलमध्ये बाल रुग्ण विभागाला पुन्हा आग लागली होती. परंतू, यावेळेस देखील शॉर्टसर्किटचे कारण देत सर्वानी जबाबदारी झटकली होती. नंतर १६ मार्चला शिवाजी मार्केट आग दुर्घटना ताजी होती त्याचंही कारण शॉर्ट सर्किट तर आज पुन्हा फॅशन मार्केटला आग लागली. प्रत्येक वेळेस शॉर्टसर्किटचं कारण देणे शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जीवावर बेतले आहे.

सतत शॉर्ट सर्किटमुळे आग लागत असतील येथील विद्युत जोडणीची देखभाल,फायर ऑडिट करणे कोणाचे काम आहे, लोकांच्या जीव जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? असे येथील नागरिकांचे म्हणेन आहे.

....
महावितरणची चौकशी झाली पाहिजे

२०१८ साली कॅन्टोन्मेंट बोर्डाने अनधिकृत मार्केट घोषणा करत मार्केट वर बंदी आणली होती, जर अनधिकृत मार्केट असेल तर या ठिकाणी लाईट मीटर कसे काय आले?विद्युत पुरवठा कोणाच्या सांगण्यावरून केला आहे? विद्युत पुरवठा देताना बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र महावितरण ने घेतलं आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

शिवाजी मार्केट आगीच्यावेळी देखील कॅन्टोन्मेंट बोर्डाने गेल्या वर्षभराअगोदर शिवाजी मार्केटचा वीजपुरवठा खंडित केला होता, असे येथील विद्युत विभाग प्रमुख सांगतात मग येथील व्यापाऱ्यांनी वीज जोड मीटर घेतलेच कसे ? त्याला कॅन्टोन्मेंटने ना हरकत पत्रक दिले कसे? आदी सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत.

Web Title: Pune Fashion Street Fire : The never ending 'fire' accidents in Pune Cantonment; The negativity of the administration is again at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.