पुण्याच्या धरणांनी गाठली नव्वदी : खडकवासल्यातून विसर्ग सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:04 PM2018-08-11T18:04:09+5:302018-08-11T18:05:20+5:30

हा पाणीसाठा बघता यंदा शहराच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता दूर झाल्यात जमा आहे.सध्या धरणात ८९.६० टक्के पाणीसाठा  आहे.

Pune dam filled upto 90 percent, water release from khadakwasla dam | पुण्याच्या धरणांनी गाठली नव्वदी : खडकवासल्यातून विसर्ग सुरु 

पुण्याच्या धरणांनी गाठली नव्वदी : खडकवासल्यातून विसर्ग सुरु 

Next

 

पुणे : धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे  पुण्यातील खडकवासला धरणसाखळीतीलपाणीसाठा नव्वद टक्क्यांवर आला आहे.सध्या धरणात ८९.६० टक्के पाणीसाठा  आहे. हा पाणीसाठा बघता यंदा शहराच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता दूर झाल्यात जमा आहे. 

      खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरण १०० टक्के भरले असून त्यापाठोपाठ पानशेत धरणही भरण्याच्या मार्गावर आहे.धरण भागात पडणाऱ्या पावसामुळे भात लावणी पूर्ण होत आली आहे. या धरण साखळीवर पुणे शहराचे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन असल्यामुळे शहरानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. दोन आठवड्यापूर्वी सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र त्यानंतर शहरात तरी पावसाने विश्रांती घेतली होती. सध्याही शहरात जोरदार पाऊस नाही. मात्र धरणात वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे आज ३२२४ पाणी सोडण्यात आले आहे. 

      धरण परिसरात पाऊस सुरु असल्याने अनेकांनी शनिवार-रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी धरण परिसराकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे पानशेत, खडकवासला भागात चारचाकी गाड्यांची गर्दी होत असून खाद्य पदार्थ विक्रीच्या प्रत्येक स्टोलवर गर्दी होत आहे. 

Web Title: Pune dam filled upto 90 percent, water release from khadakwasla dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.