पावसाने दडी मारल्याने बटाटा पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:56 AM2018-09-16T01:56:18+5:302018-09-16T01:56:37+5:30

खेड तालुक्यातील पूर्व पट्टयातील शेतकरी पावसाच्या गैरहजेरीमुळे चिंतातूर

Potato crop risk due to rains by rain | पावसाने दडी मारल्याने बटाटा पीक धोक्यात

पावसाने दडी मारल्याने बटाटा पीक धोक्यात

Next

रेटवडी : खेड तालुक्यातील पूर्व पट्टयातील शेतकरी पावसाच्या गैरहजेरीमुळे चिंतातूर झालेले आहेत. बटाटा पिकाला वाढीसाठी शेवटचे पंधरा दिवस महत्त्वाचे असल्यामुळे याच काळात पावसाची गैरहजेरी आणि कडक ऊन यामुळे पिकाच्या झाडांनी माना खाली टाकल्या आहेत.
पावसाच्या अभावामुळे उत्पादन घटणार असून त्यातच पहाटेच्या धुक्यामुळे करपा या रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. खेड तालुक्यातील पूर्व भागामध्ये रेटवडी खुर्द, जऊळके बु., गुळाणी गोसावी, पूर, कनेरसर, वाकळवाडी, जरेवाडी, वाफगाव या गावांमध्ये बटाटा हे व्यापारी पीक मोठ्या प्रमाणात घेतली आहे. बहुतांशी भाग पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पाऊस अनियमित झाल्यामुळे या पिकास धोका निर्माण होत आहे.

करपा रोगाचा पादुर्भाव
४पोषक वातावरण असल्यामुळे या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. अडीच हजार ते तीन हजार रुपये भाव असणारी आणि त्याचबरोबर शेणखत व रासायनिक खतांचा खर्च लागवड खुरपणी रोग प्रतिबंधक औषधे काढणीसाठी खर्च येत आहे. यावर्षी किलोला ३० रुपये हा भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी विविध कार्यकारी सोसायटी, स्थानिक बँका तसेच उसनवारी करून बटाटा लागवड भांडवल उपलब्ध करून शेतकºयांनी धाडस केले.

लागवडीपासून त्याची खुरपणी करेपर्यंत बेताचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी होते. परंतु शेवटच्या टप्प्यात फुगण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता होती. मात्र पावसाने निराशा केली. गणरायाच्या आगमनावेळी पावसाची अपेक्षा होती. पीक करपा रोगास बळी पडले आहे.

Web Title: Potato crop risk due to rains by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी