गुन्ह्यातील दुचाकी परत देण्यासाठी लाच घेताना अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:37 PM2018-05-09T19:37:22+5:302018-05-09T19:37:22+5:30

दौंड येथे गुन्ह्यात पकडलेली दुचाकी परत करण्यासाठी दहा हजारांची लाच स्विकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

police caught Officer accept bribe in case of return two wheeler | गुन्ह्यातील दुचाकी परत देण्यासाठी लाच घेताना अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

गुन्ह्यातील दुचाकी परत देण्यासाठी लाच घेताना अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देहा प्रकार दौंड येथील सायरस फोटो स्टुडिओ जवळच्या मोकळ्या जागेत घडला.

पुणे: दौंड येथे गुन्ह्यात पकडलेली दुचाकी परत करण्यासाठी दहा हजारांची लाच स्विकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली. या घटनेत गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या दुचाकी सोडविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने पंधरा हजारांच्या लाचेली मागणी केली होती. परंतु, तडजोड करत दहा हजार रुपयांवर गाड्या सोडण्याचे ठरले. ही रक्कम स्विकारताना आरोपींना पकडले. गोरख महादेव निल (वय ५४, सहायक फौजदार, राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग, रा कळस, विश्रांतवाडी) व सिदलिंग वणापा भंडारी (रा. महादेव मंदिराजवळ, दौंड ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. हा प्रकार दौंड येथील सायरस फोटो स्टुडिओ जवळच्या मोकळ्या जागेत घडला. तक्रारदार यांची गुन्ह्यात मोटार सायकल पकडलेली होती. सदरची मोटार सायकल सोडण्यासाठी प्रथम १५,००० रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १०,००० रुपये सिदलिंग वणापा भंडारी याच्या मार्फत स्वीकारले. 
 पोलीस निरीक्षक राजू चव्हाण व चंद्रकांत चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: police caught Officer accept bribe in case of return two wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.