Pune: नुकसानभरपाई मागितल्याच्या राग, वकील असल्याचे सांगून भररस्त्यात केला तरुणीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:32 AM2023-12-22T10:32:02+5:302023-12-22T10:32:51+5:30

पोलिसांनी दीपक शिवाजी अमराळे (३६, रा. साईकृपा बिल्डिंग, वडगाव बुद्रूक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे...

Out of anger for seeking compensation, the lawyer molested the young woman | Pune: नुकसानभरपाई मागितल्याच्या राग, वकील असल्याचे सांगून भररस्त्यात केला तरुणीचा विनयभंग

Pune: नुकसानभरपाई मागितल्याच्या राग, वकील असल्याचे सांगून भररस्त्यात केला तरुणीचा विनयभंग

पुणे : दुचाकीची धडक लागल्याने तरुणीने नुकसानभरपाई मागितली. याचा राग आल्याने तरुणीसोबत अश्लील बोलून विनयभंग केल्याची घटना पुण्यातील नीलायम पूल येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली. हा प्रकार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडला. या प्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. २०) पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दीपक शिवाजी अमराळे (३६, रा. साईकृपा बिल्डिंग, वडगाव बुद्रूक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नीलायम पूल येथील सार्वजनिक रोडवरून तिच्या दुचाकीवरून जात होती. त्यावेळी आरोपी दीपक अमराळे याच्या दुचाकीची धडक तरुणीच्या दुचाकीला बसली. यामध्ये तिच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यामुळे तिने आरोपीकडे नुकसानभरपाई मागितली. याचा राग आल्याने आरोपीने ‘मी वकील आहे,’ असे सांगून मुलीला शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच अश्लील बोलून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Web Title: Out of anger for seeking compensation, the lawyer molested the young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.