पुण्यात दोन दिवस फक्त दोनच तास दुध आणि औषधे विक्री राहणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:29 PM2020-04-22T12:29:15+5:302020-04-22T12:38:11+5:30

वारंवार आवाहन करूनही या भागात नागरिक गर्दी करत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा यासंबधीचे आदेश लागू

Only milk and medicines selling for two hours in the two days at Pune | पुण्यात दोन दिवस फक्त दोनच तास दुध आणि औषधे विक्री राहणार सुरु

पुण्यात दोन दिवस फक्त दोनच तास दुध आणि औषधे विक्री राहणार सुरु

Next
ठळक मुद्देशहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या परिसरात २३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत आदेश लागू किराणा, भाजीपालासह सर्व खरेदीला संपूर्ण बंदी

पुणे: कोरोना विषाणूच्या रूग्णांची वाढती संख्या निघत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्याच्या पुर्व भागात बुधवारी व गुरूवारी, ( दि.२२ व २३ एप्रिल) कोणत्याही खरेदीला पुर्ण मनाई केली आहे. सकाळी १० ते १२ या दरम्यान फक्त दुध व औषधविक्री सुरू राहील.
वारंवार आवाहन करूनही या भागात नागरिक गर्दी करत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा यासंबधीचे आदेश लागू केले. याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. बुधवारी सकाळीच या भागात रस्त्यावर फिरत असलेल्या नागरिकांना पोलिसांनी सक्तीने घरांमध्ये पाठवले. किराणामालासह अन्य सगळी दुकानेही बंद करायला लावली. अनेक दुकानदार सकाळी दुकाने सुरू करत या भागात विक्री करत. मध्य पुण्यातल्या पेठांमध्ये असा प्रकार अनेक ठिकाणी मागील काही दिवस सुरू होता. त्याला आळा बसणार आहे.
शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिसरात २३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत पोलिसांचा हा आदेश लागू आहे.
प्रतिबंधित क्षेत्र
परिमंडळ एक
-समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याचे संपूर्ण क्षेत्र
परिमंडळ दोन
-स्वारगेट  पोलिस ठाणे - गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट
-बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता 
परिमंडळ तीन
-दत्तवाडी पोलिस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन
परिमंडळ चार
-येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ
-खडकी पोलिस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी
परिमंडळ पाच
-कोंढवा पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग
-वानवडी पोलिस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ आणि २८

Web Title: Only milk and medicines selling for two hours in the two days at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.