Pune: मोबाइलवरून शिवी दिल्याने एकावर चाकूने हल्ला; मेदनकरवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 03:08 PM2023-11-21T15:08:40+5:302023-11-21T15:09:12+5:30

मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना...

One was attacked with a knife after swearing on mobile phone; Incident at Medankarwadi near Chakan | Pune: मोबाइलवरून शिवी दिल्याने एकावर चाकूने हल्ला; मेदनकरवाडीतील घटना

Pune: मोबाइलवरून शिवी दिल्याने एकावर चाकूने हल्ला; मेदनकरवाडीतील घटना

चाकण (पुणे) : मोबाइलवरून शिवी का दिली ? या कारणावरून अल्पवयीन मुलाने एका युवकास हाताने मारहाण करून मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना चाकण जवळील मेदनकरवाडी (ता. खेड ) येथे घडली आहे.

धीरज शिवलिंग हाडवळे ( वय.२३ वर्ष, रा. बोरजाईनगर मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे ) याने चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रितेश सुनील चव्हाण (वय.२१ वर्षे, चाकण ) आणि एका विधीसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बोरजाईनगर येथे दि.१८ ला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी धीरज हे त्यांचे राहते घरी असताना त्यांना प्रितेश चव्हाण याने फोन करून, तू राहात असलेल्या बिल्डिंगच्या खाली ये, तेव्हा फिर्यादी त्यांच्या राहत्या बिल्डिंगच्या खाली आले. तेव्हा आरोपी प्रितेश सोबत विधीसंघर्षित बालक होता. फिर्यादी खाली आल्यावर लगेच फिर्यादी यांना आरोपी व विधीसंघर्षित बालक यांनी शिवीगाळ केली. विधीसंघर्षित बालक म्हणाला की, मला मोबाइलवर शिवी का दिली? तेव्हा फिर्यादी यांनी सांगितले की तूच शिवी दिली. असे म्हणताच विधीसंघर्षित बालक याने चिडीला जाऊन हाताने मारहाण करू लागला तेव्हा फिर्यादी त्याला प्रतिकार करत होते. तेव्हा विधीसंघर्षित बालकाने त्याच्या खिशातून चाकू काढून फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर मारला. तेव्हा फिर्यादी मोठमोठ्याने ओरडत असताना त्याने डाव्या पायाच्या पाठीमागील बाजूस मारून फिर्यादीला जखमी केले. तपास चाकण पोलिस करत आहेत.

Web Title: One was attacked with a knife after swearing on mobile phone; Incident at Medankarwadi near Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.