'मला मुलगी झाली, तुम्हाला साडी घेतो' सांगत ज्येष्ठ महिलेला गंडवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:55 PM2018-06-26T16:55:51+5:302018-06-26T17:11:31+5:30

मावशी, मला मुलगी  झाली आहे, त्या आनंदात मी सगळ्यांना साड्या घेतो आहे असे सांगून गळ्यातील बासष्ट हजार किंमतीचे मंगळसूत्र लांबण्याची घडताना पुण्यात घडली आहे.

Old woman cheadted by youngster in pune | 'मला मुलगी झाली, तुम्हाला साडी घेतो' सांगत ज्येष्ठ महिलेला गंडवले 

'मला मुलगी झाली, तुम्हाला साडी घेतो' सांगत ज्येष्ठ महिलेला गंडवले 

googlenewsNext
ठळक मुद्देपासष्ट वर्षांच्या महिलेला गंडवले : साडीच्या बहाण्याने मंगळसूत्र घेऊन पसार  सोन्या मारुती चौकातील प्रकार :फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल 

पुणे :  मावशी, मला मुलगी  झाली आहे, त्या आनंदात मी सगळ्यांना साड्या घेतो आहे असे सांगून गळ्यातील बासष्ट हजार किंमतीचे मंगळसूत्र लांबण्याची घडताना पुण्यात घडली आहे. पासष्ट वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला एका इसमाने गंडा घातला असून यासंबंधी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

     याबाबत घडलेली घटना अशी की, संबंधित महिला सोन्या मारुती चौकात कामाकरिता आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे अंदाजे ३५ वर्षाच्या तरुणाने येऊन मावशी मला तुम्हाला साडी घ्यायची आहे असे सांगितले. सुरुवातीला  त्यांनी नकार दिला. मात्र त्यानंतर पुन्हा त्या तरुणाने त्यांच्याकडे येत मला मुलगी झाली आहे, त्या आनंदात मी सगळ्यांना साड्या घेत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर तुम्हाला दहा हजारांची साडी घेतो असेही तो म्हणाला. अखेर संबंधित महिलेने होकार दिल्यावर त्या तरुणाने फोनवर एका व्यक्तीला १० हजारांची साडी घे असा निरोप दिला. 

        साडी येण्याची वाट बघत असताना त्या तरुणाने महिलेला तुमच्या मंगळसूत्राची डिझाईन आवडली सांगून ते हातात घेतले. त्यानंतर तिचे लक्ष नाही हे बघून हातचलाखी केली. आणि मंगळसूत्राच्या ऐवजी पाचशे रुपयाच्या नोटेत दोन दगड बांधून दिले. हा सर्व प्रकार लक्षात येण्याअगोदर आरोपी तिथून पसार झाला होता. या प्रकारात महिलेचे बासष्ट हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र फसवणूक करून लांबवण्यात आले आहे. याबाबत फरासखाना पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Old woman cheadted by youngster in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.