फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:17 AM2018-04-05T05:17:51+5:302018-04-05T05:17:51+5:30

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या पिंपरीतील अनिता सावळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाºया दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Offensive post on Facebook; Enrolled by both | फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; दोघांवर गुन्हा दाखल

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; दोघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी (पुणे)  - कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या पिंपरीतील अनिता सावळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाºया दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र शिंदे, दिगंबर पडवळ अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी अनिता रवींद्र सावळे यांनी वाकड पोलिसांकडे मंगळवारी फिर्याद दाखल केली होती.
कोरगाव भीमा दंगलप्रकरणी सावळे यांनी एकबोटे व भिडे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. त्यांच्याविरोधात दाखल झालेला पिंपरीतील गुन्हा शिक्रापूरला वर्ग करण्यात आला. यातील आरोपी एकबोटे यांना शिक्रापूर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच भिडे यांच्या अटकेची मागणी होत आहे. अशातच अनिता सावळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली.

Web Title:  Offensive post on Facebook; Enrolled by both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.