नव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 08:53 PM2018-06-25T20:53:21+5:302018-06-25T21:04:41+5:30

इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील सर्वसाधारण सभा नव्या सभागृहात घेण्यात येईल, असा ठाम विश्वास पदाधिका-यांनी व्यक्त केला होता. मात्र.....

The new building will be set up in August for 'office admission' | नव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार

नव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार

Next
ठळक मुद्देउद्घाटन झाले आता पुन्हा अंतर्गत कामांना सुरुवातकामे पूर्ण करण्यासाठी सव्वा ते दीड महिन्यांचा अवधी

पुणे : उपराष्ट्रपतींच्या हस्ते अत्यंत घाईत उद्घाटन आटोपलेल्या महापालिकेच्या नव्या इमारतीत पदाधिका-यांच्या ‘कार्यालय प्रवेश’ साठी थेट आॅगस्ट, सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्घाटन झालेल्या सभागृहाची देखील अनेक लहान-मोठी कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याचे प्रशासनाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या अधिका-यांच्या या माहितीवरून काम अर्धवट असतानाच उद्घाटन करण्यात आल्याचे समोर आले आहे. 
    महापालिकेच्या या इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात करण्यात आले. इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील सर्वसाधारण सभा नव्या सभागृहात घेण्यात येईल, असा ठाम विश्वास पदाधिका-यांनी व्यक्त केला होता.  मात्र, काम पूर्ण नसताना तिचे उद्घाटन होत असल्याचा आक्षेप महापालिकेतील विरोधी पक्षांनी घेतला होता. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्त्यारोपही झाले. तरीही, बहुतांशी कामे करण्यात आल्याचा दावा करीत सत्ताधारी भाजपने या इमारतीचे उदघाटन केले. त्यानंतर साधारणत : आठवडाभरात या इमारतीतून कामकाज सुरू होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, सर्वच मजल्यांवरील पदाधिका-यांची दालने, सभागृह आणि छतावरील काही कामे राहिल्याचे महापालिकेच्या भवनरचना विभागाने सांगितले. ती पूर्ण करण्यासाठी सव्वा ते दीड महिन्यांचा अवधी लागेल, असेही सांगण्यात आले. 


 

Web Title: The new building will be set up in August for 'office admission'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.